पाण्यासाठी शेतक-यांचे कालव्यात उतरून आंदोलन
By Admin | Updated: July 13, 2017 14:03 IST2017-07-13T14:03:22+5:302017-07-13T14:03:22+5:30
शेतीसाठी पाणी सोडावे या मागणी साठी शेतक-यांनी सकाळी अकरा वाजता "गेवराई - उमापुर" मार्गावर रस्ता रोको केले. यानंतर काही शेतक-यांनी लगतच्या कोरड्या असलेल्या उजव्या कालव्यात उतरत आंदोलन केले.

पाण्यासाठी शेतक-यांचे कालव्यात उतरून आंदोलन
>ऑनलाईन लोकमत
बीड : गेवराई तालुक्यातुन जाणा-या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात शेतीसाठी पाणी सोडावे या मागणी साठी शेतक-यांनी सकाळी अकरा वाजता "गेवराई - उमापुर" मार्गावर रस्ता रोको केले. यानंतर काही शेतक-यांनी लगतच्या कोरड्या असलेल्या उजव्या कालव्यात उतरत आंदोलन केले.
जायकवाडीचा उजवा कालवा गेवराई तालुक्यातुन जातो. जूनमध्ये पडलेल्या पावसानंतर या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे दुबार पेरण्याचे संकट आहे या सोबतच उगवलेली पिके आता करपु लागली आहेत. हि पिके जगवण्यासाठी उजव्या कालव्यातून तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी या शेतक-यांची आहे.
प्रथम शेकडो आंदोलक शेतक-यांनी गेवराई - उमापुर या मार्गावर रस्ता रोको केले. यानंतर काही शेतक-यांनी कालव्यात उतरून आंदोलन सुरु केले. पाठबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी के. बी. शेळके यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती.