दारुविक्री विरोधात आंदोलन
By Admin | Updated: June 15, 2017 00:15 IST2017-06-15T00:10:29+5:302017-06-15T00:15:19+5:30
नांदेड: नवीन नांदेड भागातील राहुलनगर येथे अवैध दारुविक्री व्यवसायाच्या विरोधात महिलांनी कंबर कसली

दारुविक्री विरोधात आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नवीन नांदेड भागातील राहुलनगर येथे अवैध दारुविक्री व्यवसायाच्या विरोधात महिलांनी कंबर कसली असून याप्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ मंगळवारी रात्रीही या महिलांनी ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते़
वाघाळा परिसरातील राहुलनगर येथे विनापरवाना देशी दारुची विक्री करण्यात येत होती़ ती बंद करण्याच्या मागणीसाठी संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले़ महिलांनी ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले़ त्यानंतर पोलिसांनी दारुचा साठा जप्त केला़ तसेच काही जणांना ताब्यातही घेतले़
त्यानंतर बुधवारी याबाबत महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ भाजपा युवा मोर्चाच्या महादेवी मठपती यांच्यासह शेकडो महिलांनी दारुविक्री बंद करण्यासाठी आंदोलन केले होते़ या आंदोलनाला यश मिळाले आहे़