मुखेडात दारू, मटका अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: July 11, 2017 00:18 IST2017-07-11T00:15:44+5:302017-07-11T00:18:24+5:30
नांदेड: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी मुखेड तालुक्यातील अवैध धंद्यांना लक्ष केले़ पहिल्या दारूच्या कारवाईमध्ये ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

मुखेडात दारू, मटका अड्ड्यावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी मुखेड तालुक्यातील अवैध धंद्यांना लक्ष केले़ पहिल्या दारूच्या कारवाईमध्ये १७ हजार ४०० रूपयांचा तर दुसऱ्या कारवाईत पाच आरोपीसह ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़
विशेष पथकाने दुसऱ्या कारवाई नरसी रस्त्यावरील हॉटेल चंद्रमा येथे केली़ येथून पथकाने एक बुलेट व एक महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पीओ गाडीसह ५ आरोपीना अटक करून ११ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्याचबरोबर मुखेड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून १५ आरोपीसह ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास मुखेडातील अवैध दारू आणि मटका अड्ड्यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी धाडसत्र सुरू केले़ यामध्ये मुखेडमधील गंगा लॉजवरील धाडीत मटका खेळत असताना शे़अवेज जिलानी, मुखेड, रमेश कांबळे, होनवडज आणि अलाऊदीन शेख, मारतळा, शे़मियॉ बाशा साहब रा़चांडोळा यांना अटक करून १६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ बद्री शेख या एजंटाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तर मटक्याच्याच सलग दुसऱ्या धाडीत ५० हजार २५० रुपयांच्या मुद्देमालासह १२ आरोपींना अटक केल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख ओमकांत चिंचोलकर यांनी दिली़ आरोपीमध्ये व्यकंट पुजारी, तुकाराम धोतरे, शिवाजी डुमणे, संग्राम पोटफोडे, पिराजी दंडलवार, बापूराव बोडके, गोंविद कराळे, मरीबा दंडलवार, राम जाधव, यल्लपा गुंजाळे, साहेबराव दंडलवाड, नागनाथ लामतुरे या १२ आरोपींना अटक केली आहे़