अजिंठ्याच्या डोंगरात १२ बिबटे
By Admin | Updated: August 4, 2015 00:26 IST2015-08-04T00:26:29+5:302015-08-04T00:26:29+5:30
श्यामकुमार पुरे ,अजिंठा वनपरिक्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे यापूर्वीच अनेक घटनांमधून उघडकीस आले आहे. आतापर्यंत येथे दहा बिबटे असल्याचे सांगितले जात होते;

अजिंठ्याच्या डोंगरात १२ बिबटे
श्यामकुमार पुरे ,अजिंठा
वनपरिक्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे यापूर्वीच अनेक घटनांमधून उघडकीस आले आहे. आतापर्यंत येथे दहा बिबटे असल्याचे सांगितले जात होते; मात्र आता येथील बिबट्यांची संख्या १२ झाल्याचे वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून समजते. १ आॅगस्ट रोजी दूधमाल डोंगराच्या पायथ्याशी अजिंठा येथील सय्यद नूर सय्यद मुसा यांच्या शेतात एकाच वेळी नर, मादी बिबट्या व दोन पिले दिसल्याने याला अधिकृत दुजोरा मिळत आहे.
विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी बिबट्याने रवळा-जवळा, तोंडापूर शिवारात धिंगाणा घालत एका मुलाचा फडशा पाडला होता, तर एका मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. यामुळे वन विभागाने पिंजरा लावून दोन बिबट्यांना पकडले होते. त्यानंतर त्या बिबट्यांना राखीव वनात सोडण्यात आले होते. दोन वर्षांपासून जंगलात असलेल्या १० बिबट्यांनी अनेक जनावरांवर हल्ले केले; पण मनुष्यहानी केली नाही. त्यात आता एका मादीने पुन्हा दोन पिलांना जन्म दिला. आता अजिंठा डोंगरात १२ बिबटे झाले आहेत. मागील आठवड्यात अजिंठा लेणीत पर्यटकांना या बिबट्यांनी दर्शन दिले होते. त्यावर १ आॅगस्ट रोजी रात्री दूधमाल डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात पिकाची रखवाली करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर डरकाळी फोडत बिबट्या धावला होता. या घटनेमुळे अजिंठा परिसरात घबराट पसरली आहे.
$ि$िपकाची रखवाली करण्यासाठी गेलो तेव्हा डरकाळी फोडत अंगावर धावलेला बिबट्या पाहिला तेव्हा मी अक्षरश: मृत्यूलाच पाहिले, अशा शब्दात सय्यद नूर यांनी घटनेचे वर्णन केले आहे. ते म्हणाले, दूधमाल डोंगराला लागून माझी १६ एकर शेती आहे. या शेतात नेहमी वन्य प्राणी पिकांची नासाडी करतात. त्यामुळे वन विभागाने जंगलाला तार कंपाऊंड करावे. त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही व पिकांचेही नुकसान टळेल.