पुरात मोटारसायकल वाहून गेली

By Admin | Updated: July 11, 2014 01:00 IST2014-07-10T23:47:20+5:302014-07-11T01:00:00+5:30

आव्हाना : येथून जवळ असलेले तीर्थक्षेत्र श्री आत्मानंद महाराज संस्थान मंगळवेढा येथे दर्शनासाठी नदीपात्राजवळ उभी केलेली अतुल पांढरे यांची मोटारसायकल केळणा नदीला पूर आल्याने वाहून गेली.

Motorcycles were carried out in the past | पुरात मोटारसायकल वाहून गेली

पुरात मोटारसायकल वाहून गेली

आव्हाना : येथून जवळ असलेले तीर्थक्षेत्र श्री आत्मानंद महाराज संस्थान मंगळवेढा येथे दर्शनासाठी नदीपात्राजवळ उभी केलेली अतुल पांढरे यांची मोटारसायकल केळणा नदीला पूर आल्याने वाहून गेली. बराचवेळ शोध घेऊनही या गाडीचा शोध लागला नाही.
भोकरदन तालुक्यातील आव्हाना परिसरात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यांनी वेग घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पावसाअभावी कपाशीचीही लागवड केली नव्हती. परंतु या पावसामुळे शेतकरी कामाला लागले आहेत. आज झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतातील बांध फुटल्यामुळे नुकसान झाले. जोरात पाऊस झाल्यामुळे पेरणी केलेले बियाणे, खत, लहान पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Motorcycles were carried out in the past