मोटारसायकल चोरट्यांना अटक; ५ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:06 IST2021-02-23T04:06:46+5:302021-02-23T04:06:46+5:30

सिद्धेश प्रवीण शिंदे(२२, पिसादेवी रोड )आणि राणू संजय अवचार (२५, रा.एन २ सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलीस ...

Motorcycle thieves arrested; 5 bikes confiscated | मोटारसायकल चोरट्यांना अटक; ५ दुचाकी जप्त

मोटारसायकल चोरट्यांना अटक; ५ दुचाकी जप्त

सिद्धेश प्रवीण शिंदे(२२, पिसादेवी रोड )आणि राणू संजय अवचार (२५, रा.एन २ सिडको) अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले की, जवाहरनगर आणि पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत मोटारसायकल चोरी करणारे दोन चोरटे चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्यासाठी मध्यवर्ती जकात नाका येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक वसंत शेळके, हवालदार गजेंद्र शिंगणे, विजय अकोट, भाऊराव गायके, प्रदीप दंडवते, विजय वानखेडे, संदीप क्षीरसागर यानी सापळा रचून दोन्ही आरोपीला दुचाकीसह पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळील मोटारसायकल विष्णूनगर येथील संजय शिवाजी कवडे यांच्या घरासमोरुन चोरून नेल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवून कसून चौकशी केली असता, आरोपींनी आणखी चार मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. चोरलेल्या मोटारसायकल पोलिसांच्या हवाली केल्या. पोलिसांनी केलेल्या तपासात या दुचाकी सुधीर सुरडकर, साक्षी बुलबुले, सागर व्यवहारे आणि राजेंद्र शिंदे यांच्या मालकीच्या असल्याचे समोर आले.

Web Title: Motorcycle thieves arrested; 5 bikes confiscated