उदय कॉलनीतून मोटारसायकल पळविली

By | Updated: November 26, 2020 04:13 IST2020-11-26T04:13:03+5:302020-11-26T04:13:03+5:30

किरकोळ कारणावरून चाकूहल्ला औरंगाबाद : पेट्रोल पंपावर सिगारेट पिऊ नका, असे सांगणाऱ्या वृद्धाला दुचाकीस्वार आरोपींनी मारहाण केली. भांडण ...

Motorcycle hijacked from Uday Colony | उदय कॉलनीतून मोटारसायकल पळविली

उदय कॉलनीतून मोटारसायकल पळविली

किरकोळ कारणावरून चाकूहल्ला

औरंगाबाद : पेट्रोल पंपावर सिगारेट पिऊ नका, असे सांगणाऱ्या वृद्धाला दुचाकीस्वार आरोपींनी मारहाण केली. भांडण सोडविणाऱ्या मुलावर आरोपींनी चाकूहल्ला केला. पडेगाव येथील राणा पंप येथे झालेल्या या घटनेप्रकरणी अब्रार खान अकबर खान त्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

बांधकामावरून दांड्याने मारहाण

औरंगाबाद : घराचे बांधकाम करीत असताना आमच्या बाजूने खिडकी काढू नका, असे म्हणून दोघांनी एकाला दांड्याने मारहाण केली. चिकलठाणा येथे झालेल्या घटनेविषयी गणेश कुंडलिक रोठे यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदवली. सदाशिव पंडित जाधव आणि ज्ञानेश्वर पंडित जाधव, अशी आरोपींची नावे आहेत.

चिकलठाण्यातून रिक्षा पळविली

औरंगाबाद : चिकलठाणा येथे उभी रिक्षा चोरट्यांनी १३ नोव्हेंबर रोजी पळविली. आठ ते दहा दिवस शोध घेऊनही रिक्षा नजरेस न पडल्याने अनिल सुभाष दांगोडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

============

मध्यवर्ती बसस्थानकात मोटारसायकल चोरी

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकाच्या पार्किंगजवळ उभी केलेली मोटारसायकल (एमएच-२० ईएन ७११५) चोरट्यांनी पळविली. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ही घटना घडली. पंढरीनाथ जयवंतराव खेळवणे (रा. मंगरूळ, ता. सिल्लोड) यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

Web Title: Motorcycle hijacked from Uday Colony