मोटारसायकल चोरांचा धुमाकूळ
By Admin | Updated: May 18, 2016 00:15 IST2016-05-17T23:57:44+5:302016-05-18T00:15:11+5:30
औरंगाबाद : मोटारसायकल चोरांची टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून या टोळीने डझनावर मोटारसायकल पळविल्या.

मोटारसायकल चोरांचा धुमाकूळ
औरंगाबाद : मोटारसायकल चोरांची टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून या टोळीने डझनावर मोटारसायकल पळविल्या.
बळीराम सावंत (रा. भावसिंगपुरा) यांची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने सोमवारी मध्यरात्री पळविली. अयाज खान (रा. एबीएच कॉलनी, एन-१२) यांनी आपली मोटारसायकल (एमएच १०, एआर ५५४०) एका धार्मिक स्थळासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने रविवारी ती लांबविली. ज्ञानेश्वर दौड (रा. एन-९, हडको) यांची मोटारसायकल (एमएच २०, सीएन ४७८४) सनी सेंटर भागातील एका दुकानासमोरून शनिवारी लांबविण्यात आली. संजय पांडे (रा. उस्मानपुरा) यांची मोटारसायकल गुलमंडीतून लांबविण्यात आली. दत्तात्रय गवळी यांच्या दोन दुचाकी (एमएच २०, डीझेड १९१४ आणि एमएच १७, एडब्ल्यू १००५) वडगाव कोल्हाटी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून सोमवारी रात्री पळविल्या.
ताहेर खान (रा. पीरबाजार) हे आपल्या आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी बन्सीलालनगरातील एका रुग्णालयात गेले होते. रुग्णालयाच्या पार्किंगमधील त्यांची दुचाकी (एमएच २०, बीके ९७३०) शनिवारी रात्री पळविण्यात आली. संकेत पवार, अक्षय साळी या विद्यार्थ्यांच्या दुचाकी (एमएच २०, डीपी ५०३७ आणि एमएच २०, डीपी ०२०५) एन-९, हडकोतून शनिवारी रात्री लंपास करण्यात आल्या. शेख मोहसीन यांची दुचाकी (एमएच २०, सीएल ८९८२) अज्ञात चोरट्याने बीड बायपासवरील एका लॉन्स समोरून पळविली. अन्य एका घटनेत साईनाथ डहाळे (रा. शिवाजीनगर) यांची दुचाकी (एमएच २०, डीजे ८४७५) हँडल लॉक तोडून रविवारी रात्री लांबविण्यात आली.