शिक्षण संस्थेच्या मालकीहक्कावरून मोतीवाला कुटुंबात हाणामारी; पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST2021-07-09T04:06:03+5:302021-07-09T04:06:03+5:30
मोतीवाला कुटुंबाच्या शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून आपल्या मुलाचे नाव लावावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून अश्रफ मोतीवाला ...

शिक्षण संस्थेच्या मालकीहक्कावरून मोतीवाला कुटुंबात हाणामारी; पोलिसांत गुन्हा
मोतीवाला कुटुंबाच्या शिक्षण संस्थेत पदाधिकारी म्हणून आपल्या मुलाचे नाव लावावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून अश्रफ मोतीवाला त्यांचे चुलत भाऊ अतिक मोतीवाला यांच्याकडे करीत आहेत. मात्र, तुमच्या कुटुंबाचे शिक्षण संस्था उभारण्यात योगदान नाही, असे म्हणून अतिक आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांची मागणी धुडकावून लावली. अश्रफ यांच्या चुलत्यांनी गुरुवारी दुपारी संपत्तीच्या वादाविषयी चर्चा करण्यासाठी बोलावल्याचे सांगून अश्रफ यांनी त्यांच्या पत्नीला निराला बाजार येथील ट्रेड सेंटर येथे बोलावले. अश्रफ यांची पत्नी समर्थनगर येथील कार्यालयात गेल्यावर तेथे त्यांनी पुन्हा त्यांच्या मुलाचे नाव शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळात घेण्यास तुझा विरोध कशासाठी, असा जाब अतिक यांना विचारला. यावरून त्यांच्यात जोरदार तू तू मै मै झाली. यावेळी अतिक यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तेथून हाकलून दिले. तेव्हा अश्रफ हे जखमी अवस्थेत होते. त्यांना मारहाण करण्यात आल्याचे समजल्यावर हे दाम्पत्य आणि अन्य दोन महिलांसह अतिक मोतीवाला यांच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. अश्फाक मोतीवाला यांनी शिवीगाळ करून हाकलले. यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल करून मदत मागितली. कार्यालयाबाहेर आल्यावर मागे आलेल्या अतिकने पोलिसांत तक्रार केली का, असे विचारत धमकावल्याचे तक्रारीत नमूद केले. या घटनेनंतर त्यांनी घाटीत उपचार घेतल्यावर रात्री क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली.
यावरून पोलिसांनी विनयभंग, मारहाण व जीवे मारण्याची धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.