भिंत कोसळून मायलेकी ठार

By Admin | Updated: October 22, 2014 01:19 IST2014-10-22T00:43:15+5:302014-10-22T01:19:16+5:30

माजलगाव : येथील बागवान गल्लीतील मुल्ला मस्जीदजवळ राहणाऱ्या मजूर कुटुंबावर सोमवारी रात्री ११ वाजता भर झोपेत भिंत कोसळली.

Motherke killed by wall collapsing | भिंत कोसळून मायलेकी ठार

भिंत कोसळून मायलेकी ठार


माजलगाव : येथील बागवान गल्लीतील मुल्ला मस्जीदजवळ राहणाऱ्या मजूर कुटुंबावर सोमवारी रात्री ११ वाजता भर झोपेत भिंत कोसळली. यामध्ये मायलेकी भिंतीखाली दबून जागीच गतप्राण झाल्या तर दोघे जखमी झाली आहेत.
फरझाना नजबोद्दीन इनामदार (वय-४२), अंजुम नजबोद्दीन इनामदार (वय-१३) अशी मयत मायलेकीची नावे आहेत. शाहेदा नजबोद्दीन, आवेज नजबोद्दीन हे जखमी झाले आहेत.
इनामदार कुटुंबीय झोपेत असताना जुन्या घराची भिंत कोसळली. यात चारही जण गाडले गेले. दोघेजण कसेबसे ढिगाऱ्यातून वाचले. त्यांना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अदनान बालंबाल बचावला
ही घटना घडली तेव्हा इनामदार यांचा मुलगा अदनान हा बाजूच्या खोलीत झोपलेला होता. त्यामुळे तो बालंबाल बचावला. भिंत कोसळल्याचा आवाज ऐकून अदनान जागा झाला. त्याने आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत मायलेकी ढिगाऱ्याखाली दबल्या होत्या. दरम्यान, या भिंतीमध्ये वीस ते पंचेवीस किलो वजनाचे दगड होते. मातीचा वापर करून बांधलेली ही भिंत जिर्ण झाली होती. या भिंतीतील दगडानेच मायलेकींचा घात केला. (वार्ताहर)

Web Title: Motherke killed by wall collapsing