शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'आईच पाठवायची परपुरुषासोबत'; प्रियकरासोबत पळालेल्या अल्पवयीन मुलीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 16:33 IST

आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीस अनैतिक संबंध ठेवण्यास पाडले भाग

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (औरंगाबाद) : आईनेच पोटच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस ७० वर्षीय हॉटेल मालकासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याने वैतागलेल्या मुलीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केले. इकडे आईने मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर अजिंठा पोलिसांनी केलेल्या तपासात फिर्यादी आईच आरोपी निघाली. ही घटना सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे घडली.

रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी (वय १७) व तिची आई (३७) सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथील रहिवासी आहेत. या अल्पवयीन मुलीची आई ही बाळापूर येथील सलीम मलिक (७०) या हॉटेल व्ह्यू पॉईंट या हॉटेल मालकाच्या घरात कपडे धुण्याचे काम करत होती. सोबत मुलीलाही घेऊन जात होती. सलीम मलिक याचा अल्पवयीन मुलीवर डोळा होता. त्याने या महिलेस आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले. दोन वर्षांपासून तो सतत तिच्यावर बलात्कार करत होता; पण हे संबंध त्या मुलीला पसंत नव्हते, म्हणून तिने तिचा प्रियकर राहुल दिलीप निंभोरे (२१, रा. बाळापूर) याला फोन केला व आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगितले.

११ नोव्हेंबर रोजी ती सारोळा येथून पुणे येथे पळून गेली. त्यानंतर पाठीमागून राहुल पुण्याला गेला. तेथे त्यांनी एका ठिकाणी लग्न केले. त्यानंतर ते पुणे येथे काही दिवस व नंतर गुजरात येथील राजकोटमध्ये भाड्याने खोली घेऊन पती-पत्नीसारखे राहू लागले. इकडे मुलीच्या आईने आपली मुलगी हरवली आहे, अशी तक्रार अजिंठा पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर रोजी दिली. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला असता, गुजरात राज्यातील राजकोट येथे हे दोघे असल्याची माहिती त्यांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, फौजदार धम्मदीप काकडे यांनी त्यांना शोधून सारोळा येथे आणले. ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी राहुल विरुद्ध पोक्सो व बलात्काराचे गुन्हे दाखल केले व अल्पवयीन मुलीस बाल सुधारगृहात पाठविले.

येथे हे प्रकरण संपले, असे पोलिसांना वाटत असताना याप्रकरणी वेगळीच माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालय व बाल कल्याण समितीची परवानगी घेऊन ती फाईल पुन्हा उघडली. त्या मुलीचा इनकॅमेरा जवाब नोंदविण्यास सिल्लोड न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी पोलिसांनी इनकॅमेरा पीडितेचा जबाब घेतला. यावेळी तिने आपबिती सांगितली. त्यावरून पोलिसांनी आई, हॉटेल मालक व प्रियकर यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई व राहुल निंभोरे यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने आरोपींची शुक्रवारी हर्सुल कारागृहात रवानगी केली. तिसरा आरोपी सलीम मलिक हा फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बळजबरी करणार होते लग्नअजिंठा पोलिसांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारले असता, तिने, मला आई-वडिलांकडे पाठवू नका, ते माझे लग्न बळजबरी दुसऱ्यासोबत लावून देणार आहेत. त्यात राहुलचा दोष नाही, तो माझा प्रियकर आहे. सलीम मलिक याने माझ्यावर जबरदस्ती केली. त्याला माझ्या आईने मदत केली व माझ्यावर दबाव आणला. दोषींवर कारवाई करा, अशी मागणी केली अन् हे प्रकरण समोर आले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी