‘त्या’ आईने नाकारले; शिशुगृहात मिळाले ‘प्रेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:41 IST2017-08-06T23:41:14+5:302017-08-06T23:41:23+5:30
लग्नानंतर १५ दिवसांत अल्पवयीन मुलगी माता झाली. त्यानंतर तिला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अखेर समाजापासून तोंड लपविण्यासाठी तिने पोटच्या बाळाला नाकारले; परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तिच्या बाळाला जालना येथील आर.आर. बंग शिशुगृहात ‘प्रेम’ मिळाले.

‘त्या’ आईने नाकारले; शिशुगृहात मिळाले ‘प्रेम
’लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लग्नानंतर १५ दिवसांत अल्पवयीन मुलगी माता झाली. त्यानंतर तिला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अखेर समाजापासून तोंड लपविण्यासाठी तिने पोटच्या बाळाला नाकारले; परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तिच्या बाळाला जालना येथील आर.आर. बंग शिशुगृहात ‘प्रेम’ मिळाले.
पाटोदा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह गेवराई तालुक्यात झाला होता. आठ दिवस सुखाने संसार चालला. नंतर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला माहेरी पाठविण्यात आले. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला; परंतु याची चर्चा समाजात वेगळीच होती. सुटी झाल्यानंतर सदरील मातेला घरी पाठविण्यात आले; परंतु समाजातील बदनामीच्या भीतीने तिने व तिच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे, अशोक तांगडे, मनीषा तोकले यांच्याकडे धाव घेतली. त्यांचे समुपदेशन केले. बालकल्याण समितीच्या माध्यमातून मदत करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिच्या बाळाला शिशुगृहात पाठविले. यावेळी दत्ता नलावडे, सय्यद उपस्थित होते.