शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
4
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
5
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
6
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
7
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
8
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
9
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
10
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
11
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
12
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
13
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
14
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
15
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
16
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
17
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
18
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
19
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
20
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा

माता न तू वैरिणी...! आईने मारहाण करीत चिमुकल्यास गरम तव्यावर बसवून दिले चटके

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 13:25 IST

पोटच्या गोळ्याला मारहाण करून दिले चटके; चाइल्ड हेल्पलाइन व पोलिसांनी केली तीन मुलांची सुटका

-महेमूद शेखवाळूज महानगर : जन्मदात्या आईने आपल्या ६ वर्षांच्या चिमुकल्याचा अमानुष छळ करीत त्यास मारहाण करून चटके दिल्याची खळबळजनक घटना वाळूज उद्योगनगरीत उघडकीस आली आहे. याचा व्हिडीओ दक्ष नागरिकाने चाइल्ड हेल्पलाइनला पाठविल्याने पोलिसांच्या मदतीने चाइल्ड हेल्पलाइनने मुलासह त्याच्या दोन भावांची सुटका केली.

घाणेगाव परिसरात आई, तिचा प्रियकर व दोन भावांसह वास्तव्यास असणाऱ्या अजय (नाव बदलले आहे) याला मारहाण करून त्याच्या शरीरावर चटके दिले असल्याचा व्हिडिओ सोमवारी एका दक्ष नागरिकाने बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने यांना पाठविला होता. शेरखाने यांनी चाइल्ड हेल्पलाइनच्या केंद्र समन्वयक अन्नपूर्णा ढोरे यांना या प्रकरणाची माहिती दिली होती. ही माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाइनचे समुपदेशक गोविंद तांगडे व आम्रपाली बोर्डे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या मदतीने सोमवारी घरमालकाकडे चौकशी केली असता महिला व पुरुष बाहेरगावी गेल्याचे समजले. तिन्ही भावंडे घरातच होती. विशेष म्हणजे हे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वीच घाणेगावात किरायाने राहण्यासाठी आल्याचे घरमालकाने सांगत त्यांच्याविषयी अधिक माहिती नसल्याचे सांगितले. पोलिस व चाइल्ड हेल्पलाइनने अजय व त्याच्या दोन मोठ्या भावांना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नेले.

आईने मारहाण करीत गरम तव्यावर बसवून चटके दिलेपोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी या मुलांना सुरुवातीला खाऊपिऊ घालून विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलांनी आमचे पप्पा दुसरेच असून, आई नेहमी अजयला उपाशी ठेवून मारहाण करून चटके देत असल्याचे सांगितले. आईने अजयच्या पायाला चटके दिलेले असून, त्यास गरम तव्यावर बसविल्याने त्याचे व्रण उमटलेले आहेत. आईने केलेल्या मारहाणीत अजयचा उजवा पाय मोडला असून, तो लंगडत चालत असल्याचे त्याच्या मोठ्या भावांनी सांगितले. आई खायला देत नसल्याने अजय उघड्यावर पडलेले अन्नपदार्थ खाऊन भूक शमवित होता.

चिमुकल्याची बालसुधारगृहात रवानगीपोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी उपनिरीक्षक स्वाती उचित, पो.कॉ. सतवंत सोहळे, गणेश सागरे, किशोर गाडे, चाइल्ड हेल्पलाइनचे गोविंद तांगडे, आम्रपाली बोर्डे, विजय देशमुख यांच्या मदतीने मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. नंतर तिन्ही भावांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. महिला व तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीने मंगळवारी बालसुधारगृहात जाऊन आम्हाला मुले नको असल्याचे बाल कल्याण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. महिलेने सोबत असलेल्या इसमासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे व तो मुलांचा पिता नसल्याचे सांगितले. तिन्ही भावंडांनीही आईकडे परत जाण्यास नकार दिला. आईला मुलांच्या ओळखीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार