हिंगोली मतदारसंघात मिळाला सर्वाधिक निधी
By Admin | Updated: August 30, 2014 00:01 IST2014-08-29T23:51:22+5:302014-08-30T00:01:36+5:30
हिंगोली : जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांसाठी ३ कोटी २४ लाखांचा निधी मिळाला आहे

हिंगोली मतदारसंघात मिळाला सर्वाधिक निधी
हिंगोली : जिल्ह्यात राज्य शासनाच्या वतीने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील रस्ते, गटारे व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांसाठी ३ कोटी २४ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यात हिंगोली मतदारसंघाला सर्वाधिक १.६0 कोटींचा वाटा मिळाला असून आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
या योजनेत कळमनुरीसाठी जवळपास ९४ लाख तर वसमतला ७0 लाखांचा निधी मिळाला आहे. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांसाठी २0१४-१५ या वित्तीय वर्षात ५७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. टप्प्या-टप्प्याने निधीचे वितरण करण्यात येत आहे. यात हिंगोली जिल्ह्याला ३.२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना सदर रक्कम वितरित करण्यात आली आहे.
या योजनेतील कामांची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यासही सांगण्यात आले आहे. याबाबतचा आदेश नुकताच ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे अवर सचिव प्रकाश वळवी यांनी काढला.
यामध्ये सेनगाव तालुक्यात चिचरवेड्यात-५ लाख, खडकी ५ लाख, लिंगदरी ५ लाख, आडोळ रस्त्यासाठी ५ लाख, पानकन्हेरगावला ५ लाख, उमरदरी ४ लाख, लिंबाळा तांडा-५ लाख, वेलतुरा-५ लाख, दातारा बु.-५ लाख, बन ४ लाख, हिवरखेडा-५ लाख, भंडारी-५ लाख, बामणी-५ लाख, बोरखडी-५ लाख, गणेशपूर-५ लाख, शिवणी-५ लाख, हिंगोली तालुक्यात पहेनी-५ लाख, अंधारवाडी-५ लाख, घोटा-५ लाख, कडती-५ लाख, कानडखेडा-५ लाख, जांभरूण आंध-४ लाख, वैजापूर-५ लाख, देऊळगाव-४ लाख, सवड-५ लाख, आठ्ठरवाडी-५ लाख, लिंबाळा मक्ता-४ लाख, काळकोंडी-५ लाख, नवलगव्हाण-५ लाख, इडोळी-५ लाख, इंचा-५ लाख व वरूड चक्रपानला १0 लाख असा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे अनेक गावांतील रस्त्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे गोरेगावकर यांनी सांगितले.
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ-५ लाख, वरूड-५ लाख, येलकी-५ लाख, मसोड-१३ लाख, घोळवा-८ लाख, सुकळीवीर-५ लाख, गुंडलवाडी-४ लाख, आखाडा बाळापूर-८ लाख, खापरखेडा-५ लाख, नवखा-४ लाख, दांडेगाव-५ लाख, कुपटी-४ लाख, जटाळवाडी-४ लाख, रामवाडी-४ लाख, सालवाडी-५ लाख, जलधाबासाठी १0 लाख, डोंगरकडासाठी ५ लाख, जामगव्हाणसाठी ५ लाख असा निधी मंजूर झाला आहे.
तर वसमत तालुक्यात भोगाव-४ लाख, पुयणी-४ लाख, टाकळगाव-४ लाख, हट्टा-५ लाख, रिधुरा- ५लाख, तेलगाव-५ लाख, धानोरा-५ लाख, एकरुखा-५ लाख मंजूर झाले.