आयुक्तालयासाठी औसा व निलंग्यातून सर्वाधिक हरकती

By Admin | Updated: January 23, 2015 00:55 IST2015-01-23T00:29:46+5:302015-01-23T00:55:26+5:30

लातूर : आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा दौऱ्याला प्रारंभ झाला असून, गुरुवारी औसा व निलंगा शहरात संघर्ष समितीची बैठक झाली

The most anticipated from the Ausa and the Nilangs for the Ayodhya | आयुक्तालयासाठी औसा व निलंग्यातून सर्वाधिक हरकती

आयुक्तालयासाठी औसा व निलंग्यातून सर्वाधिक हरकती


लातूर : आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हा दौऱ्याला प्रारंभ झाला असून, गुरुवारी औसा व निलंगा शहरात संघर्ष समितीची बैठक झाली. या बैठकीला दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी या तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीचे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अ‍ॅड. उदय गवारे, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. आण्णाराव पाटील, अ‍ॅड. भारत साबदे, अ‍ॅड. गणेश गोमचाळे यांनी निलंगा येथे बैठक घेतली. निलंग्यातील बैठकीला नगराध्यक्षा विद्याताई धानोरकर, विजयकुमार पाटील निलंगेकर, हमिद शेख, संजय दोरवे, डॉ. भिकाने, अजित माने आदींची उपस्थिती होती. तर औसा येथे झालेल्या बैठकीला नारायण लोखंडे, राजेंद्र मोरे आदींची उपस्थिती होती. दोन्हीही तालुक्यांतून हरकती नोंदविण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते सरसावले असून, आयुक्तालय निर्माण संघर्ष समिती जे ठरवेल, त्यात या दोन्हीही तालुक्यांचा पुढाकार असेल, असे कार्यकर्त्यांनी अभिवचन दिले. या दोन्हीही तालुक्यांतून आयुक्तालयासाठी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचा निर्धार करण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: The most anticipated from the Ausa and the Nilangs for the Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.