सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन
By Admin | Updated: March 19, 2015 00:18 IST2015-03-18T23:58:27+5:302015-03-19T00:18:17+5:30
बीड : थकित वेतनासाठी अतिरिक्त शिक्षकांचे धरणे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन अशा पद्धतीने शिक्षकांचा लढा सुरु आहे.

सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन
बीड : थकित वेतनासाठी अतिरिक्त शिक्षकांचे धरणे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही सुरुच होते. सकाळी शाळा अन् दुपारी आंदोलन अशा पद्धतीने शिक्षकांचा लढा सुरु आहे.
भारतीय बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाकडून सोमवारपासून अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनप्रश्नी जि.प. समोर धरणे सुरु आहेत. सोमवारी संपूर्ण दिवसभर आंदोलन केल्यानंतर मंगळवारपासून शिक्षकांनी सकाळच्या सत्रात शाळा व दुपारनंतर आंदोलन असा पवित्रा घेतला आहे. यामुळे कर्तव्यासोबतच स्वत:च्या मागण्या पुढे रेटण्याची दुहेरी भूमिका शिक्षकांनी घेतली आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार नाही, असा इशारा संस्थापक विजयकुमार समूद्रे यांनी दिला आहे. इतर शिक्षक संघटनांनीही बहुजन कर्मचारी कल्याण महासंघाच्या आंदोलनाला टेकू देत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
शेख मुस्सा, श्रीराम आघाव, एच. डी. सरवदे, सूर्यकांत जोगदंड, आत्माराम आगळे, चंदक्र ांत आर्सूळ, दिलीप स्वामी, भाऊसाहेब हंगे, नामदेव वाघ, संजय राठोड, अशोक सातपूते, विठ्ठल फुलझळके, प्रकाश गाडे आदींचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)
शिक्षणाधिकारी (प्रा.) सुखदेव सानप यांनी आंदोलन करणाऱ्या अतिरिक्त शिक्षकांची साधी विचारपूसही केली नाही की त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्नही केला नाही. तिसऱ्या दिवशीही सानप आंदोलनकर्त्यांकडे फिरकलेही नव्हते. या शिक्षकांची संचमान्यताच नाही, त्यामुळे वेतन कोठून देणार? असा सवाल सानप यांनी केला.