शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या रांगा

By admin | Updated: August 17, 2015 00:04 IST

औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरामध्ये श्रावण उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी संस्थानने तयारी पूर्ण केली

औंढा नागनाथ : बारा ज्योतिर्लिंगा पैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागनाथ मंदिरामध्ये श्रावण उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांसाठी संस्थानने तयारी पूर्ण केली असून यासाठी सुमारे ५०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी पहाटे २.३० वाजता मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार तथा संस्थानचे अध्यक्ष शाम मदनूरकर यांनी दिली. श्री नागनाथ संस्थानचा विश्वस्थांची ११ आॅगस्ट रोजी बैठक घेण्यात आली होती. १५ ते १३ सप्टेंबर पर्यंत श्रावना निमित्त येथे भाविकांची मोठी गर्दी होती. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी स्काऊट गाईड व विविध महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. तसेच भाविकांना सुलभ दर्शनासाठी रॅलींग, बाहेर पाण्यापासून संरक्षणासाठी दर्शनरांग मंडप उभारण्यात आला आहे. तसेच भाविकांसाठी अल्पदरात भोजनाचे आयोजन केले असून जवळपास ३०० हून अधिक भाविक या योजनेचा लाभ घेत आहेत. श्रावण महिण्यात ही संख्या वाढणार असल्याने जादा कर्मचाऱ्यांची या विभागावर नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून मंदिरात व परिसरात १६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या ठिकाणी दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, ६ पोलिस निरीक्षक, ३५ फौजदार, २५० पोलिस शिपाई, ४८ महिला पोलिस, ६५ होमगार्ड, दोन दंगा नियंत्रक पथक तसेच बाँम्ब शोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा आतंकवाद विरोधी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त पोलिस अधिक्षक कैलास कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली. ज्योतिर्लिंग असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी मंदिरामध्ये नारळाचा वापर करण्यात येऊ नये असा ठराव संस्थानच्या वतीने व पोलिस प्रशासनाने घेतला असून तसेच आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. परिवहन विभागाच्या वतीने हिंगोली, वसमत, कळमनुरी, जिंतुर, गंगाखेड, परभणी या आगारातून प्रत्येकी ५ -५ म्हणजे एकूण ३० बसेस भाविकांच्या सेवेसाठी सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख मुपाडे यांनी दिली आहे. मंदिर प्रांगणामध्ये आरोग्य केंद्र, पोलिस दक्षता कक्ष, विद्युत विभाग, नगरपंचायतीचे कर्मचारी स्थापन करण्यात आले आहेत. बैठकीस संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार शाम मदनुरकर, सचिव गजानन वाखरकर, सहसचिव विद्या पवार, विश्वस्त रमेश बगडीया, डॉ. किशन लखमावार, महेश बियाणी, गणेश देशमुख, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, देविदास कदम, डॉ. पुरुषोत्तम देव, अ‍ॅड. कावरखे, शिवाजी देशपांडे, आनंद निलावार, डॉ. देवीदास खरात, निळकंठ देव, वैजनाथ पवार, शंकर काळे, बापुराव देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)