शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांपेक्षा अडचणीच अधिक

By admin | Updated: August 5, 2015 00:36 IST

बीड : प्रशासनाकडून कृषि विभागांतर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मात्र प्रस्ताव दाखल करण्यापासून योजना पदरात पाडून घेण्यापर्यंत

बीड : प्रशासनाकडून कृषि विभागांतर्गत अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना मात्र प्रस्ताव दाखल करण्यापासून योजना पदरात पाडून घेण्यापर्यंत एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत. किचकड पद्धतीमुळे व अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या लुटीमुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहे. योजनांनुसार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. यामध्ये सात बारा उतारा व आठ अ ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याकरिताही तलाठी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. योजना शेतकऱ्यांच्या असल्या तरी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अर्थार्जनाच्या उद्देशामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे परिणाम प्रस्ताव पुर्ण न झाल्याने अनेक योजना बारगळल्या आहेत. शेतकऱ्यांकडून पिकविमा, फळबागांचे नुकसान तसेच ठिबकसिंचनाच्या योजना मिळवण्यासाठी अधिक प्रस्ताव कृषि विभागाकडे दाखल होत आहेत. या मुख्य योजनांकरिता शेतकऱ्यांना तलाठी, ग्रामपंचायत कार्यालय त्याचप्रमाणे राष्टीयीकृत बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. बँकेतही अडवणूक होत असल्याने प्रस्तावात घट होत असल्याचे येथील कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्ताव नाकारल्यास त्याचे कारणही शेतकऱ्यांना सांगितले जात नाही. कृषी योजनांची माहिती व प्रस्ताव दाखल करण्यास अडचण निर्माण झाल्यास कृषी सहायकांची बँकेत नेमणूक करणे आवश्यक आहे. मात्र त्याची अंमलबजावनी होत नाही. यातच ठिबक सिंचनासंबधीत योजनांची अंमलबजावनी आॅनलाईनद्वारेच करणे बंधनकारक आहे. याविषयी शेतकरी अ त असल्यामुळे योजनांच्या माध्यमातून लाभ तर लांबच मात्र शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. यामुळे शेतकरी तर वंचित राहत आहे योजनांवरील कोट्यावधीचा निधी शासनाकडे परत जात आहे. त्यामुळे कृषिच्या योजना केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)