जिल्ह्यात पंधराहून अधिक बंधारे फुटले
By Admin | Updated: September 20, 2015 01:11 IST2015-09-20T01:10:33+5:302015-09-20T01:11:28+5:30
वडोदबाजार : फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरातून वाहणाऱ्या गिरिजा नदीच्या पात्रातील सहा ठिकाणचे कोल्हापुरी बंधारे शुक्रवारी आलेल्या पुराने फुटले.

जिल्ह्यात पंधराहून अधिक बंधारे फुटले
निजामपूर : जैताणे येथील भिल्ल वस्तीत राहणा:या सीताबाई भावसिंग पवार (वय 60) या वृद्धेचा मृतदेह आखाडे गावाजवळ आज मिळाला.
रोहिणी नदीला शुक्रवारी पूर आला होता. त्यात सीताबाई पवार या वाहून गेल्या होत्या. शोध घेऊनही त्यांचा तपास लागू शकला नव्हता. तसेच नदीला मोठा पूर असल्याने तपासाला मर्यादाही पडल्या. अखेर शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह आखाडे गावाजवळ मिळाला.
याप्रकरणी भावसिंग रामसिंग पवार (62) जैताणे यांनी येथील पोलिसांत खबर दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार जगताप करीत आहेत.