विधानसभेसाठी काँग्रेसकडून लढण्यास ७५ हून अधिक इच्छुक
By Admin | Updated: August 12, 2014 02:01 IST2014-08-12T01:41:00+5:302014-08-12T02:01:39+5:30
औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून ७५ हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी

विधानसभेसाठी काँग्रेसकडून लढण्यास ७५ हून अधिक इच्छुक
औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी घेऊन लढण्यासाठी इच्छुकांच्या उड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून ७५ हून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत.
प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशानुसार दि. १ ते १० आॅगस्टदरम्यान इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. पश्चिम मतदारसंघातून तब्बल ३० जणांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यात शहर सरचिटणीस रामकुमार जाधव, महेंद्र रमंडवाल, जालिंदर शेंडगे, आत्माराम बोराडे, चंद्रभान पारखे, रावसाहेब गायकवाड, अॅड. सुनीता तायडे, भीमराव शेरे, हरिभाऊ शेळके , डॉ. पवन डोंगरे, डॉ. जितेंद्र देहाडे, संजीवनी महापुरे, गौतम माळकरी, क्रृष्णा भंडारे आदींचा समावेश आहे.
मध्य मतदार संघातून शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्यासह १८ जण इच्छुक आहेत. जेम्स अंबिलढगे, जीएसए अन्सारी, इब्राहिम पठाण, शेख अथर, प्रा. मोहन देशमुख, राजेंद्र दाते आदींचा त्यात प्रमुख समावेश आहे. पूर्व मतदार संघातून विद्यमान आमदार राजेंद्र दर्डा, अहमद हुसेन, अन्वर शेरखान व जीएसए अन्सारी हे चौघे इच्छुक आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी दिली.
औरंगाबाद ग्रामीण मतदारसंघातील सिल्लोड मतदारसंघातून विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचा एकमेव अर्ज आहे, तर फुलंब्री मतदार संघातून विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह जाधव या दोघांचे अर्ज आहेत. पैठणमधून रवींद्र काळे, रामनाथ चोरमले, विनोद तांबे, भोसले आदींचे अर्ज आहेत. गंगापुरातून संजय जाधव, श्रीमती जाधव, किरण पाटील, जगन्नाथ खोसरे, शोभा खोरसे, अनिल पटेल हे इच्छुक आहेत. कन्नड मतदारसंघातून अनिल सोनवणे, उज्ज्वला सोनवणे, नामदेव पवार, अशोक मगर, उत्तम राठोड, तात्याराव पाटील, गजानन सुरासे आणि वैजापुरातून दिनेश परदेशी, जगन्नाथ जाधव, संजय निकम, ज्ञानेश्वर जगताप आदी प्रमुखांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी सांगितले. हे अर्ज प्रदेश कमिटीकडे उद्या पाठविले जाणार असल्याचे ते म्हणाले. दि. १५ ते २० आॅगस्टदरम्यान पहिली यादी प्रसिद्ध होऊ शकते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.