सदतीस अति संवेदनशील मतदान केंद्रे

By Admin | Updated: October 12, 2014 00:41 IST2014-10-12T00:41:49+5:302014-10-12T00:41:49+5:30

सुनील कच्छवे, औरंगाबाद विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

More than 70 sensitive polling stations | सदतीस अति संवेदनशील मतदान केंद्रे

सदतीस अति संवेदनशील मतदान केंद्रे

सुनील कच्छवे, औरंगाबाद
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यावेळी सर्व नऊ मतदारसंघांतील क्रिटिकल केंद्रांची संख्या ३७ इतकी आहे. सर्वाधिक केंदे्र सिल्लोड विधानसभा मतदारसंघात आहेत. या केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत.
याआधीच्या निवडणुकांमध्ये ज्या केंद्रांवर काही गडबड झाली असेल, जिथे २५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, जिथे एकाच उमेदवाराला जास्त मतदान झाले असेल, बोगस मतदानाचे प्रकार घडले असतील अशा केंद्रांची क्रिटिकल मतदान केंद्रे म्हणून निवड करण्यात आली आहे. यापैकी ९ मतदान केंद्रे औरंगाबाद शहरातील आहेत, तर उर्वरित केंदे्र शहराबाहेरील आहेत.
या केंद्रांवर विशेष लक्ष असणार आहे. प्रत्येक क्रिटिकल मतदान केंद्रावर राज्य राखीव दल किंवा सीमा सुरक्षा दलाची अर्धी कंपनी तैनात असणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर एक सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केला जाणार आहे, असे उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.
सिल्लोड : डोंगरगाव, भराडी तसेच सिल्लोड केंद्र क्र. २३७, २३९, २४०, २४२, २५३, २५८, २६२, २६४, २४१, २५७ क्रमांकाची केंद्रे.
कन्नड : मकरणपूर, कन्नड केंद्र क्र. १९१, बोरसर, माटेगाव.
फुलंब्री : मुकुंदवाडी, आळंद, खामगाव, वरूड काझी.
औरंगाबाद मध्य : शहाबाजार, बेगमपुरा, गांधीनगर, धावणी मोहल्ला.
औरंगाबाद पश्चिम : गांधेली.
औरंगाबाद पूर्व : बायजीपुरा केंद्र क्र. ६५, इंदिरानगर, बायजीपुरा ८७, संजयनगर.
पैठण : नेहरू चौक.
गंगापूर : गंगापूर २६१, रांजणगाव शेणपुंजी, जामगाव.
वैजापूर : शिऊर, खंडाळा, लासूरगाव, वैजापूर केंद्र क्र. १७८, महालगाव.

Web Title: More than 70 sensitive polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.