जालना विभागातून सैैलानीबाबा यात्रेसाठी १२० जादा बसेस
By Admin | Updated: March 12, 2017 23:24 IST2017-03-12T23:23:16+5:302017-03-12T23:24:40+5:30
जालना : विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैैलानीबाबा यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना विभागाने १२५ बसेसचे नियोजन केले आहे.

जालना विभागातून सैैलानीबाबा यात्रेसाठी १२० जादा बसेस
जालना : विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैैलानीबाबा यात्रेनिमित्त एसटी महामंडळाच्या जालना विभागाने १२५ बसेसचे नियोजन केले आहे. गर्दी वाढल्यास यात ५० ते ६० बसेसची अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे.
जालनापासून सुमारे शंभर किमी अंतराव सैैलानीबाबांचे स्थान आहे. मराठवाड्यातील हजारो भाविक रेल्वेने जालना येथे येतात. त्यांच्यासाठी जालना आगारासह इतर चार आगारांनीही बसेसची व्यवस्था केली आहे. जालना आगारातून ३५, जाफराबाद ३५, परतूर १५, अंबड २५ व काही जादा फेऱ्या मिळून १२० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रवासी भारमान ७० एवढे राहणार आहे. १७ मार्चरोजी संदल मिरवणूक आहे. या दिवशी भाविकांची गर्दी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.गर्दी वाढल्यास अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात येणार आहे.
जालना आगारप्रमुख एस. जी. मेहेत्रे म्हणाले, सैैलानी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने चोख नियोजन केले आहे. सुमारे १२० बसेसचे नियोजन विभागातून करण्यात आले आहे. विभागनियंत्रक प्रशांत भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची स्थापना करण्यात आली असून, भाविकांच्या सेवेसाठी महामंडळ व्यवस्था करण्यात आल्याचे मेहेत्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)