मोर्चा, आंदोलनाने जिल्हा दणाणला
By Admin | Updated: July 16, 2014 01:26 IST2014-07-16T00:32:44+5:302014-07-16T01:26:11+5:30
उस्मानाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार सेना व लिंगायत समाजाने मंगळवारी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़

मोर्चा, आंदोलनाने जिल्हा दणाणला
उस्मानाबाद : आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार सेना व लिंगायत समाजाने मंगळवारी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ तर खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे़ नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत बेमुदत काम बंदचे हत्यार उपसले आहे़
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील वर्ग ३ व ४ चे कर्मचारी तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी आंदोलन केले होते़ तर मंगळवारी मल्हार सेना, लिंगायत समाजानेही रस्त्यावर उतरून आरक्षणाची जोरदार मागणी केली़ उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मल्हार सेनेच्या मोर्चात जिल्हा प्रमुख धनाजी सातपुते, चंद्रकांत बनसोडे, प्रकाश घोडके, विष्णू घोडके, महानंदा पल्ौवान, गजानन पैैलवान, बसवराज भोगे, गणेश सोनटक्के, नंदकिशोर हजारे, गणेश शिंगाडे, आश्रुबा कोळेकर, विाजी गावडे, शंकर वाघे आदी सहभागी झाले होते़ तर लिंगायत समाजाच्या मोर्चात रेवणसिध्द लामतुरे, राजेंद्र मुंडे, गोविंद पाटील, प्रसन्न कथले, अॅड़शैैलेंद्र यावलकर, अॅड़नागनाथ कानडे, शंकर कोरे, वैजिनाथ गुळवे, श्रीकांत साखरे, चंदन भडंगे, सुरेंद्र आवटे आदी सहभागी झाले होते़ खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांच्या धरणे आंदोलनात सुनील चव्हाण, संजय जाधव, विजयकुमार कदम, व्ही़व्ही़बाजगुळे, एस़जीक़ांबळे, आऱडी़मुळीक, डी़व्ही़बिराजदार, व्ही़एम़मगर, मुजावर आदी सहभागी झाले होते़ तर राज्य नपगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्या पालिकेसमोरील धरणे आंदोलनात संभाजी राजेनिंबाळकर, अमर ताकमोघे, श्रध्दा साळुंके, एस़बी़इंगळे, कल्याण गायकवाड, ज्योतीराम कांबळे आदी सहभागी झाले होते़
भूम येथील पालिका कामगारांच्या संपात न. प. च्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष फारुक इस्माईल पठाण, उपाध्यक्ष महादेव भानुदास शिंदे, सचिव सर्जेराव भोळे, राजाभाऊ कांबळे, गोविंद कुलकर्णी यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत. भूम येथील लिंगायत समाजाच्या आंदोलनात माजी जि. प. अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, डॉ. शिवशंकर खोले, दीपक खराडे, शिवशंकर सोलापुरे, सूर्यकांत गवळी, सिद्धेश्वर मनगिरे यांच्यासह इतर समाज बांधवांची उपस्थिती होती.
उमरगा येथे लिंगायत समाजाच्या मोर्चा आंदोलनात डॉ़एम़एस़मलंग, सिद्रामप्पा चिंचोळे, वैजिनाथ माशाळकर, एम़ओ़पाटील, राजेंद्र पतंगे, नगरसेवक विजय दळगडे, श्रीकांत पतगे, श्रीकांत पतगे, शरणाप्पा येळापुरे, अॅड़पी़एऩपणुरे, अशोक पतंगे, चंद्रकांत मजगे, महेश माशाळकर, अप्पू दंडगे, युवराज हेबळे, शंकर दंडगे, श्रीशैल व्हंडरे आदी समाज बांधव सहभागी झाले होते़ तर पालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात एम़आऱशेख, शेषेराव भोसले, जहीर फुलारी, बाबूराव जाधव, बाबूराव सुरवसे, एस़एम़सोनवणे, सुरेश भोसले, करबस शिरगुरे, नारायण सोनकांबळे, एस़एम़मोरे, बालाजी जाधव, महानंदा स्वामी, सुशीलाबाई सुरवसे, नागेश कापसे, मंजूर शेख, पुतळाबाई हेळवी, अमर करंजकर यांच्यासह आदींनी सहभाग नोंदविला होता. (वार्ताहर)
अतिरिक्त शिक्षक
अतिरिक्त शिक्षकांचे जोपर्यंत शासन समायोजन करीत नाही तोपर्यंत त्यांचा वेतन चालू ठेवावा, ज्या अतिरिक्त शिक्षकांना समायोजनाचे आदेश दिलेले नाहीत त्यांना ते तत्काळ द्यावेत, जिल्हा ठाणे येथील अतिरिक्त शिक्षकांच्या ज्या आदेशाप्रमाणे वेतन चालू ठेवण्यात आले आहे, त्या धर्तीवर वेतन चालू ठेवावे, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून देय असलेला पहिला हप्ता नियमाप्रमाणे द्यावा, ज्या अतिरिक्त शिक्षकांना शाळेत समायोजन करून घेत नाहीत अशा संस्था चालकांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़
लिंगायत समाज
लिंगायत समाजातील ज्यांना आरक्षण आहे त्यांचे आरक्षण कायम ठेवून इतर संपूर्ण लिंगायत समाजास ओबीसीचा दर्जा मिळावा, लिंगायत समाजास महाराष्ट्रात लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, लिंगायत समाजास अल्प संख्याक दर्जा मिळण्याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात यावी, आदी विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत़ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी आश्वासन दिलेले असताना अद्याप मागण्या मान्य न झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे़
नगर परिषद कर्मचारी
राज्यातील नगर पालिका, नगर पंचायत कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे, २७ मार्च २००० पूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत कायम करावे, १९९३ पूर्वी कायम झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना अनुकंपा धारकाचा व इतर शासकीय सेवेचा लाभ द्यावा, अनुकंपा धारकाची स्थायी नेमणूक आदी १९ मागण्या करण्यात आल्या आहेत़
मल्हार सेना
राज्य शासनाच्या ग्रामपंचायत अॅक्ट १९५१ मागासवर्गीय कोर्ट फी स्टँप फी मध्ये सवलती देण्यासंदर्भात सन १९९६ पासून प्रकाशित केलेल्या राजपत्रात, जनजाती मंत्रालयाकडून सन २००७-०८ पासूनच्या अहवाल इंग्रजीत अनुसूचित जातीच्या यादीत इंग्रजी प्रतीत क्ऱ२६ वर असून, धनगर व देवनागरी लिपीतील प्रतीत क्रमांक ३६ वर धनगर असा उल्लेख आहे़ त्यामुळे वर्षानुवर्षे होत असलेली मागणी मान्य करून राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे़