बजाजनगरातून मोपेड लांबविली

By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:52+5:302020-12-02T04:11:52+5:30

------------------------------------- लांझी चौक अतिक्रमणाच्या विळख्यात वाळूज महानगर : वाळूजच्या लांझी चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. ...

Moped removed from Bajajnagar | बजाजनगरातून मोपेड लांबविली

बजाजनगरातून मोपेड लांबविली

-------------------------------------

लांझी चौक अतिक्रमणाच्या विळख्यात

वाळूज महानगर : वाळूजच्या लांझी चौकाला अतिक्रमणाचा विळखा पडल्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे. या चौकात फळ विक्रेते, फेरीवाले व हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटले आहेत. तेथे येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे नागरिक व वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे. या अतिक्रमणाकडे ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याची ओरड नागरिकातून होत आहे.

-------------------------------

धोकादायक डीपी हटवा

वाळूज महानगर : साजापूर नागरी वसाहतीलगतच्या धोकादायक विद्युत डीपीमुळे अप्रिय घटना घडण्याची भीती आहे. वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत डीपी असून तेथे लहान मुले खेळतात. मोकाट जनावरेही या डीपीजवळ घुटमळतात. ही धोकादायक विद्युत डीपी इतरत्र हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

------------------------------

पंढरपुरात सप्ताहाची सांगता

वाळूज महानगर : छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच सांगता झाली. या सप्ताहात ह.भ.प.महंत कैलासगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले. महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. श्री विठ्ठल संस्थानचे पदाधिकारी व वळदगाव-पंढरपूरच्या ग्रामस्थांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

-------------------

जोगेश्वरीत पथदिवे निद्रावस्थेत

वाळूज महानगर : जोगेश्वरीतील न्यू आंबेडकरनगर या वसाहतीतील पथदिवे सतत बंद राहत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. रात्रीच्यावेळी कंपनीतून घरी परतणाऱ्या कामगारांना अंधाराचा फायदा घेऊन लुटतात. भुरटे चोरटे घरासमोरील वस्तुही लांबवित असल्याची ओरड होते आहे. बंद पथदिवे सुरु करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

------------------------

Web Title: Moped removed from Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.