नाणेटंचाईमुळे आज मोंढा बंद

By Admin | Updated: June 12, 2016 22:52 IST2016-06-12T22:47:01+5:302016-06-12T22:52:35+5:30

हिंगोली : येथील मोंढ्यात मागील काही दिवसांपासून हळद व धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नाणेटंचाई निर्माण झाल्याने सोमवारी मोंढा बंद राहणार

Monsoon closure today due to a shortage of money | नाणेटंचाईमुळे आज मोंढा बंद

नाणेटंचाईमुळे आज मोंढा बंद

हिंगोली : येथील मोंढ्यात मागील काही दिवसांपासून हळद व धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नाणेटंचाई निर्माण झाल्याने सोमवारी मोंढा बंद राहणार असल्याची माहिती कृ.ऊ.बा.चे सचिव सय्यद जब्बार पटेल यांनी दिली आहे.
मोंढ्यामध्ये मागील काही दिवसांपासून हळद व भुसार मालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. शेतकऱ्यांना शेडमध्ये हळद टाकण्यास जागा मिळत नसल्यावरून गोंधळ झाला. त्यानंतर हमाल संघटनानेही केलेल्या गोंधळामुळे काही दिवस मोंढा बंद ठेवण्याची वेळ आली होती. नंतर सुरळीतपणे मोंढा सुरू झाला. तेव्हा इतर भुसार माल मोठ्या प्रमाणात आल्याने नाणेटंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याने सोमवारी मोंढा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारच्या दिवशी शेतकऱ्यांनी हळद व धान्य विक्रीस न आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव सय्यद जब्बार पटेल यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Monsoon closure today due to a shortage of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.