शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात १७ जूननंतर मान्सून होणार सक्रिय; हवामानातील बदलाने पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 12:33 IST

खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत

औरंगाबाद : मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मात्र, खरीप हंगामातील पेरणीस सज्ज असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दडी दिल्याने आणखी पाच ते सहा दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. 

यंदाच्या मोसमात ९७ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटसह भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यातच नियोजित वेळेप्रमाणे मान्सून अंदमान, निकोबारमार्गे देशात दाखल झाला. मराठवाड्यासह काही भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरीही लावली. मान्सून वेळेत दाखल होण्याची शक्यता असतानाच अचानक औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारली. पावसासाठी हवामानातील योग्य बदल होत नसल्याने अनेक ठिकाणी पाऊस लांबला आहे. वातावरणातील बदल आणि पावसासाठी योग्य होणारी परिस्थिती कमकुवत झाल्याने पाऊस लांबला आहे, तर नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आदी जिल्ह्यांतही १२ ते १६ जून या काळात पावसाची शक्यता कमीच आहे. 

हवामानातील बदलांमुळे या जिल्ह्यांमध्येही १६ जूननंतरच मान्सून खऱ्या अर्थाने मराठवाड्यात सक्रिय होणार असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. मराठवाड्यात काही ठिकाणी कपाशीची लागवड झाली असली तरी सोयाबीन, मूग, तूर, बाजरी आदी पिकांची पेरणी पाऊस लांबल्याने खोळंबली आहे. चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी सुरु करता येणार आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मान्सूनसाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

चांगला पाऊस असेल तरच पेरणी...पाऊस चांगला असेल तरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. अन्यथा प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे. पावसाचे प्रमाण कमी असेल आणि शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास ती वाया जाण्याची भीती अधिक असते. दुबार पेरणीचे संकट येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे कृषितज्ज्ञांनी  म्हटले आहे. 

सध्या पावसा योग्य वातावरण नाही मराठवाड्यात १० किंवा ११ जून रोजी मान्सून दाखल व्हायला हवा होता. मात्र, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत पावसायोग्य हवामान नसून, मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण १६ जूननंतर असेल. त्यानंतर पावसाची समाधानकारक हजेरी लागेल. - श्रीनिवास औंधकर, संचालक, खगोलशास्त्र विभाग, एमजीएम, औरंगाबाद

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसenvironmentपर्यावरण