मनी पेज/सिंगला

By | Updated: November 28, 2020 04:10 IST2020-11-28T04:10:44+5:302020-11-28T04:10:44+5:30

बंदी लादण्याची मागणी नवी दिल्ली : आपल्या प्लॅटफॉर्मवरील वस्तूंचा ‘उत्पादक देश’विषयक तपशील न दिल्यामुळे ॲमेझॉनवर सात दिवसांची बंदी लादण्यात ...

Money Page / Single | मनी पेज/सिंगला

मनी पेज/सिंगला

बंदी लादण्याची मागणी

नवी दिल्ली : आपल्या प्लॅटफॉर्मवरील वस्तूंचा ‘उत्पादक देश’विषयक तपशील न दिल्यामुळे ॲमेझॉनवर सात दिवसांची बंदी लादण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काइट) आणि आरएसएसप्रणीत स्वदेशी जागरण मंचने (एसजेएम) केली आहे. याप्रकरणी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ॲमेझॉनला २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. तथापि, तो पुरेसा नसल्याचे काइट आणि एसजेएमने म्हटले आहे.

.....

व्यापारी जहाजांवर अडकलेल्यांच्या

सुटकेसाठी बेझोस यांना आवाहन

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीच्या निर्बंधांमुळे विविध व्यापारी जहाजांवर अडकून पडलेल्या चार लाख सागरी कामगारांची सुटका करण्यासाठी मदत करा, असे आवाहन ॲमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना जहाज वाहतूक उद्योगाने केले आहे. जहाज कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे कामगार म्हणून मान्यता देण्यासाठी अमेरिकेचे आगामी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनावर दबाव आणण्याची मागणीही बेझोस यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

..................

३२ हजार कर्मचाऱ्यांना

डिस्ने देणार नारळ

नवी दिल्ली : २०२१च्या पहिल्या सहामाहीत ३२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय वॉल्ट डिस्नेने घेतला आहे. २८ हजार कर्मचाऱ्यांना फर्लो रजेवर पाठविण्याचा निर्णय कंपनीने सप्टेंबरमध्येच जाहीर केला होता. थीम पार्कमधील कामगारांना प्राधान्याने काढण्यात येणार आहे. चौथ्या तिमाहीत कोरोनामुळे कंपनीचा व्यवसाय २३ टक्क्यांनी कमी होऊन १४.७१ अब्जांवर घसरला आहे.

...................

निगराणी साधनामुळे

मायक्रोसॉफ्टवर टीका

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने आणलेल्या ‘प्राॅडक्टिव्हिटी स्कोअर’ साधनामुळे (टूल) कंपनीवर तीव्र टीका होत आहे. मायक्रोसॉफ्ट ३६५ नावाचे हे साधन कर्मचाऱ्यांवर वैयक्तिक पातळीवर निगराणी करते. कामाच्या दिवसांत कर्मचारी किती मेल पाठवतो अथवा चॅटचा किती वापर करतो, याचे मोजमाप हे साधन करते. ऑस्ट्रेलियाई संशोधक वोल्फी ख्रिस्टल यांनी या फीचरला ‘समस्याकारक’ म्हटले आहे.

..................

फॉक्सकॉनचे आयपॅड

उत्पादन जाणार चीनबाहेर

नवी दिल्ली : ॲपलची पुरवठादार कंपनी फॉक्सकॉनने आयपॅड आणि मॅकबुकचे उत्पादन प्रथमच चीनबाहेर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. ॲपलच्या विनंतीनंतर फॉक्सकॉन ही उत्पादने व्हिएतनाममध्ये बनविणार आहे. चीन-अमेरिका संघर्षाचा आपल्या उत्पादनावरील परिणाम टाळण्यासाठी ॲपलने ही विनंती फॉक्सकॉनला केली होती.

....................

फ्लिपकार्टच्या व्यवसायाचे

एकीकरण अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : वॉलमार्ट इंडियाच्या व्यवसायाचे फ्लिपकार्ट होलसेलच्या व्यवसायाशी एकीकरण करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. वॉलमार्ट इंडियाच्या होम ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यासंबंधीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. जुलैमध्ये फ्लिपकार्ट समूहाने वॉलमार्ट इंडियाच्या ‘बेस्ट प्राइस’चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती.

.....................

Web Title: Money Page / Single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.