‘एटीएम’मधून पैशांची पळवापळवी
By Admin | Updated: September 30, 2014 01:25 IST2014-09-29T23:59:10+5:302014-09-30T01:25:08+5:30
जालना : शहरातील एटीएममधून लोकांचे पासवर्ड चोरून पैसे काढून घेणारी व आपल्या जवळील एटीएम कार्ड देणारी टोळी सक्रिय झाली आहे. आतापर्यंत तीन घटना घडल्या असून हे चोरटे

‘एटीएम’मधून पैशांची पळवापळवी
जालना : शहरातील एटीएममधून लोकांचे पासवर्ड चोरून पैसे काढून घेणारी व आपल्या जवळील एटीएम कार्ड देणारी टोळी सक्रिय झाली आहे. आतापर्यंत तीन घटना घडल्या असून हे चोरटे सी.सी. टी.व्ही. कॅमेऱ्यात धूसर दिसत आहेत. फुटेजमध्ये या टोळीतील चोरटे परराज्यातील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
सदर बाजार बाजार ठाण्याचे उपनिरीक्षक गोकुलसिंह बुंदेले यांनी सांगितले, शहरात आतापर्यंत एटीएमचा पासवर्ड चोरून पाहून वयस्कर व्यक्तींची फसवणूक होत आहे. वयस्कर पैसे काढतांना अथवा भरतांना अडचण आल्यास सहकार्य करण्याच्या भावनेतून पुढे येऊन एटीएम कार्ड बदलून दिले जाते. अतिशय चलाखीने हे काम क्षणात करून एटीएम घेऊन पसार होतात. शिवाय पासवर्डही पाहून घेतात. यासाठी एकावेळी दोघेजण एटीएममध्ये घुसून मदत करतात. आतापर्यंत तीन प्रकार समोर आले असून सर्वच घटना अगदी सारख्या आहेत.
सी.सी. टी.व्हीच्या फुटेजमधूनही अंदाज बांधणे कठीण झाले आहेत. एका एटीएमच्या कार्डचा सुगावा लागला असून हे कार्ड पश्चिम बंगाल राज्यातील शेख गुलाल या व्यक्तीच्या नावाचे आहे. हे कार्ड अजूनही बंद करण्यात आलेले नाही.
संभाजीनगर भागातील सेवानिवृत्त कर्मचारी सरदारसिंग यांच्या एटीएमचे पासवर्ड चोरून त्यांच्या खात्यातून ४० हजार रूपये काढून घेण्यात आले. भोेकरदन नाका भागात एका खाजगी बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला. हा प्रकार सिंग यांच्या लक्षात सहा दिवसांनी आल्याचे सहायक निरीक्षक मनिष पाटील यांनी सांगितले. हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला.
जैन शाळेत सेवक असलेले राजू रामलाल राडा हे शिवणकाम करणाऱ्या पत्नीच्या खात्यात एटीएमद्वारे पैसे भरण्यासाठी शिवाजी पुतळा भागातील एटीएममध्ये गेले. ५९ हजार ६०० रूपये भरणा करीत असतांना अचानक मशिन बंद पडले. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासाठी दोघेजण तेथे आले. त्यांनी पैसे भरण्यासाठी थाडा यांना मदत केली. जातांना हातचलाखी करून आपल्याजवळील एटीएम थाडा यांना दिले. थाडा यांचे मूळ एटीएम घेऊन पसार झाले. या कार्डद्वारे एटीएममधून चोरट्यांनी ४० हजार रूपये काढले. त्यानंतर देवास व शिर्डी येथूनही २० हजार ६०० रूपये काढले. थाडा यांच्या मोबाईलवर सहा एसएमएस आल्यानंतरही लक्ष दिले नाही. मात्र मुलीच्या शिकवणीचे पैसे भरण्यासाठी एटीएममध्ये गेले. त्यावेळी सदरचे एटीएम कार्ड हे दुसऱ्याचे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडला. मंठा तालुक्यातील गोसावी पांगरी येथील संतोष फकीरा पवार यांच्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखा वाटूरमध्ये बँक खात आहे. या खात्यातून कोणीतरी ४३ हजार ५०० रूपये काढून घेतले. हा प्रकार २ जुलै २०१४ ते १३ सप्टेंबर २०१४ दरम्यान घडला. संतोष पवार यांनी परतूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.