पैसे मागणाऱ्याला कोंडले; दोघांवर गुन्हा
By Admin | Updated: March 22, 2017 00:39 IST2017-03-22T00:36:33+5:302017-03-22T00:39:17+5:30
भोकरदन : ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे वसुलीसाठी बोरगाव जहांगिर येथे कोंडून ठेवल्याच्या कारणावरून भोकरदन पोलिस ठाण्यात दोघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पैसे मागणाऱ्याला कोंडले; दोघांवर गुन्हा
भोकरदन : ऊस तोडणीसाठी घेतलेले पैसे वसुलीसाठी बोरगाव जहांगिर येथे कोंडून ठेवल्याच्या कारणावरून भोकरदन पोलिस ठाण्यात दोघा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या बाबत विमलबाई निवृत्ती घोरपडे रा मेनगाव ता़देऊळगावराजा, यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की जितेद्र शेषराव दांडगे व त्याची आई शोभाबाई शेषराव दांडगे रा़ बोरगाव जहांगिर यांनी १८ मार्च ते २० मार्चच्या दरम्यान पैशाच्या देवाण घेवाणीवरून आम्हाला बोरगाव जहांगिर येथील घरात कोंडून ठेऊन मारहाण केली व जिवेमारण्याच्या धमकी दिली त्यावरून वरील मुलगा व आई विरूध्द ३४२,३२३,५०४,५०६,३४ भा़द़वि़ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तर अर्चना जितेंद्र दांडगे यांनी भोकरदन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की २० मार्च रोजी लहु काशीनाथ तोडे रा़ मेरा ता़ चिखली, आकाश प्रकाश माळे रा़ देऊळगावराजा, कमलबाई कौतिक खेची रा़लिंगेवाडी, शामराव खंदारे रा़ चिंचचेडा, राहुल निवृत्ती घोरपडे, कौतीक शामराव खेची यांनी ऊस तोडणीच्या पैशावरून मुकादमाच्या घरासमोर येऊन दगड मारून शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गैरकायद्याची मंडळी जमा केली या कारणावरून त्याच्या विरूध्द १४३,१४९,३२३,५०४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)