विद्यापीठाचा सोमवारी ६३ वा वर्धापन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:03 IST2021-08-21T04:03:57+5:302021-08-21T04:03:57+5:30
---- औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन सोमवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत ...

विद्यापीठाचा सोमवारी ६३ वा वर्धापन दिन
----
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा वर्धापन दिन सोमवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर नाट्यगृहात सकाळी १०.३० वाजता मुख्य समारंभ होईल.
डॉ. कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात नियुक्ती झाल्यानंतर ते प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदाच विद्यापीठात येणार आहेत. या वेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ‘जीवनसाधना पुरस्कार‘ प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आदर्श परीक्षा केंद्र पुरस्काराचे वितरण होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. सूर्यवंशी व डॉ. मुस्तजिब खान यांनी केले आहे.