शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोमोज पडले तब्बल वीस लाखांना; खाण्याच्या नादात गाडी ‘अनलॉक’, बॅग चोरांकडून लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:56 IST

हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर गाडीमधील बॅग गायब असल्याचे लक्षात आले.

छत्रपती संभाजीनगर : कारचा दरवाजा लॉक न करताच मोमोज खाण्यासाठी गेलेले इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कर्मचारी चोरट्यांच्या जाळ्यात सापडले. चोरट्यांनी कारमधून २० लाख रुपये रोख रक्कम क्षणार्धात लंपास केली. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता हडकोच्या डी मार्ट मॉलसमोर घडली. याप्रकरणी २८ जून रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वऱ्हालबाबू सत्यम कुरपुरोल हे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत अकाउंटंट आहेत. २६ जून रोजी सायंकाळी त्यांना प्रकल्प समन्वयक आनंदराव यांनी कंपनीची २० लाखांची रोख जालन्याच्या कार्यालयात पोहोचविण्याची जबाबदारी दिली होती. पैसे घेऊन वऱ्हालबाबू दोन सहकाऱ्यांसह व चालकासह पैठण गेट परिसरात खरेदीसाठी गेले. त्यानंतर दिल्ली गेट मार्गे हर्सूल टी पॉइंटच्या दिशेने गाडी निघाली. दरम्यान, भूक लागल्याने त्यांनी चालकाला डी मार्टसमोरील मोमोज हॉटेलजवळ गाडी थांबविण्यास सांगितले.

लॉक लावण्याचा विसर?मोमोज खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाताना वऱ्हालबाबूंनी २० लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग कारमध्येच ठेवली होती. हॉटेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना बॅग गायब असल्याचे लक्षात आले. त्यांच्या दाव्यानुसार, चालकाने गाडीचे दरवाजे लॉक केले नव्हते. हॉटेलचालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीने पांढरा शर्ट व टोपी परिधान केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर