चिमुकल्याचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 23:50 IST2017-06-20T23:48:15+5:302017-06-20T23:50:34+5:30
वडवणी : खेळताना नदीपात्रातील खड्ड्यात पडल्याने एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला.

चिमुकल्याचा बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : खेळताना नदीपात्रातील खड्ड्यात पडल्याने एका अडीच वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
ऋषीकेश रामदास राऊस असे त्या चिमुकल्याचे नाव आहे. ऋषिकेश हा मंगळवारी सकाळी अंगणात खेळत होता. खेळत खेळत तो जवळीलच महादेव मंदिराजवळ गेला. जवळच नदीपात्र आहे. नुकताच पाऊस झाला असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. ऋषीकेशही खेळताना पात्रातील खड्ड्यात पडला. इकडे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. परंतु तो मिळून आला नाही. अखेर काही लोकांना त्याचा मृतदेह खड्डयात दिसून आला.