महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
By Admin | Updated: January 3, 2017 00:06 IST2017-01-03T00:04:12+5:302017-01-03T00:06:45+5:30
जालना : रस्त्यावरील बॅरीकेट काढण्यावरून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शहरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी घडली

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग
जालना : रस्त्यावरील बॅरीकेट काढण्यावरून कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान शहरातील वाहतूक शाखेच्या कार्यालयाशेजारी घडली. महिला पोलीस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरून एकाविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
बसस्थानक ते मामाचौक मार्ग एकेरी वाहतूक सुरू आहे. कार नेण्यास बंदी असताना त्याने ती नेली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. समोर जाण्यासाठी बॅरीकेट काढण्याचा त्याने प्रयत्न केला. यातून हा प्रकार घडला.