महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 17, 2014 00:31 IST2014-08-17T00:27:26+5:302014-08-17T00:31:21+5:30

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील नवखा येथे १४ आॅगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली.

Molestation of woman; Filed the complaint | महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील नवखा येथे १४ आॅगस्ट रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपी मारोती बापूराव खोरणे याच्याविरूध्द बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील महिला एकटी असताना मारोती खोरणे हा शिव्या देत तिच्या घराकडे गेला. महिलेने घराचा दरवाजा उघडला असता पदर ओढून त्याने तिचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. त्यावरून आरोपी मारोती खोरणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार खरात करीत आहेत.
बालिकेवर अत्याचार
वसमत : तालुक्यातील मरलापुर येथे सहा वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना १५ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
सदरील बालिकेच्या घरात कुणी नसताना ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरील बालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अधिक तपास सपोनि सुनील नाईक करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Molestation of woman; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.