आजोबा आणि ड्रायव्हरनेच केला दोन चिमुकल्यांचा विनयभंग
By Admin | Updated: October 15, 2016 01:21 IST2016-10-15T01:08:25+5:302016-10-15T01:21:09+5:30
औरंगाबाद : बालकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जवळच्या व्यक्तीच अधिक असतात, असे वारंवार सिद्ध झालेले आहे.

आजोबा आणि ड्रायव्हरनेच केला दोन चिमुकल्यांचा विनयभंग
औरंगाबाद : बालकांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांमध्ये जवळच्या व्यक्तीच अधिक असतात, असे वारंवार सिद्ध झालेले आहे. अशाच एका घटनेत सिडको एन-३ सारख्या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींची त्यांचे आजोबा आणि शाळेत सोडणाऱ्या वाहनचालकानेच त्यांची छेड काढल्याचे समोर आले.
याप्रकरणी महिला व
बालकल्याण समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशाने मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात तीन महिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक जाधव असे वाहनचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार दोन्ही बहिणींचे अनुक्रमे वय १५ आणि १२ वर्षे आहे. मोठी मुलगी दहावीत शिकत आहे. त्यांचे वडील २०१३ मध्ये मरण पावले. जानेवारीत त्यांच्या आईने प्रेमविवाह केला. तेव्हापासून त्या चिमुकल्यांचे आजी-आजोबा आणि दोन आत्या त्या राहत असलेल्या घरात राहण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्या आईने प्रेमविवाह केल्याबाबत त्यांना टोमणे मारले जाते. एवढेच नव्हे तर आजोबा हा त्यांच्यासमोर कपडे बदलताना भान ठेवत नाही. तसेच त्या मुलींना शाळेत ने-आण करणारा अशोक जाधव नावाचा वाहनचालकही त्यांच्यावर वाईट नजर ठेवून होता. मुली कपडे बदलत असताना त्यांना तो चोरून पाहत असे, मोठ्या मुलीस दुचाकी चालविण्यास सांगून मागे बसायचा आणि तिच्या शरीरास स्पर्श करायचा. याबाबतची माहिती या दोन्ही बहिणींनी आजी आणि दोन्ही आत्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी याबाबत कोठेही वाच्यता करू नका, असे म्हणून त्यांना गप्प राहण्यास भाग पाडले.