सुनेचा विनयभंग, सासऱ्यास अटक
By Admin | Updated: July 11, 2016 00:17 IST2016-07-10T23:52:30+5:302016-07-11T00:17:57+5:30
भोकरदन : दुखत असल्याचा बहाणा करून सुनेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील नांजा येथे ४ जुलै रोजी घडली.

सुनेचा विनयभंग, सासऱ्यास अटक
भोकरदन : दुखत असल्याचा बहाणा करून सुनेला बोलावून तिचा विनयभंग केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील नांजा येथे ४ जुलै रोजी घडली.
नांजा गावातील अंबादास मोरे याने दुखत असल्याचे बनावणी करून आपल्या सुनेला झेंडू बाम घेऊन बोलावले. ते डोक्याला लावून देण्याचे सांगत वाईट हेतूने तिला स्पर्श करीत विनयभंग केला. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात सुनेच्या तक्रारीवरून अंबादास मोरे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास रविवारी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरप हे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार केंद्रे यांनी दिली.
वीजपुरवठा खंडित
परतूर: तालुक्यात रविवारी झालेल्या पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरूस्तीच्या नावाखाली थातूरमातूर कामे केली जात असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)