अंबाजोगाईत विद्यार्थिनीचा दुकानदाराकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 00:28 IST2017-05-24T00:26:42+5:302017-05-24T00:28:09+5:30
अंबाजोगाई : वह्या खरेदी करण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला.

अंबाजोगाईत विद्यार्थिनीचा दुकानदाराकडून विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : वह्या खरेदी करण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय मुलीचा दुकानदाराने विनयभंग केला. ही घटना शहरातील मियॉभाई कॉलनीत मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी विनयभंग व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पीडित मुलगी मियॉभाई कॉलनीत आजोळी रहाते. तिचे वडील कामानिमित्त परगावी असतात. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता वह्या खरेदी करण्यासाठी ते गल्लीतीलच शेख सिराज शेख मुन्शी याच्या दुकानात गेली. यावेळी दुकानदाराने तिचा विनयभंग केला. आश्रू ढाळत ती घरी परतली. तिच्या आईने तिची चौकशी केली तेंव्हा खरा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद झाला. शेख सिराजला अटक करण्यात आली आहे.