महावितरणच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: June 26, 2017 00:14 IST2017-06-26T00:10:34+5:302017-06-26T00:14:31+5:30
नवीन नांदेड: महावितरण कंपनीतील २७ वर्षीय कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका पुरूष तंत्रज्ञाविरूद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कर्मचारी महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन नांदेड: महावितरण कंपनीतील २७ वर्षीय कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एका पुरूष तंत्रज्ञाविरूद्ध नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नांदेड भागातील वाघाळा येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या हरीहर भोसले याने एका कर्मचाऱ्यास तू माझ्या पत्नीला फोनवर का बोलली, असे म्हणाला. तो आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने वाघाळा येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयाजवळ २१ जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला़, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार डी. एन. मोरे व मदतनीस पो. कॉ. माणिक आवाड यांनी दिली.
याप्रकरणी पीडित महिला कर्मचाऱ्याने २४ जून रोजी सायंकाळी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात हरीहर भोसले याच्याविरूद्ध गुन्हा नोंद झाला़ पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. गजानन मोरे व पो. कॉ. वसंत तिडके हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.