परराज्यीय विद्यार्थिनींचा विनयभंग
By Admin | Updated: January 26, 2017 00:15 IST2017-01-26T00:14:01+5:302017-01-26T00:15:14+5:30
कळंब : प्रोजेक्टसाठी आलेल्या परराज्यीय तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

परराज्यीय विद्यार्थिनींचा विनयभंग
कळंब : प्रोजेक्टसाठी आलेल्या परराज्यीय तीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील हसेगाव (के़) येथे घडली़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील एका महाविद्यालयातील तीन परराज्यीय मुली तालुक्यातील हासेगाव (के़) येथे प्रोजेक्टसाठी आल्या होत्या़ मंगळवारी त्या कळंब शहरात आल्यानंतर ग्रामीण भागात जाण्यासाठी एका टमटममध्ये बसल्या़ त्यावेळी तेथे आलेल्या संतोष प्रकाश लिके (रा़ खेर्डा़ ताक़ळंब) याने त्यांचा विनयभंग केला़ मुली हासेगाव येथील त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर लिकेही तेथे गेला़ तेथील बाथरूमच्या दरवाजाच्या मागे लिके दडून बसला होता़ एक मुलगी फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर तिला लिके दिसला़ तिने आरडाओरड करताच लिके याने तिचा विनयभंग केला़
तसेच तेथे आलेल्या एका मुलीच्या हाताला चावा घेऊन पळ काढला़ त्यावेळी काही कर्मचारी तेथे दाखल झाले़ त्यांनी पाठलाग करून लिकेला जेरबंद करीत पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात संतोष प्रकाश लिके याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे़ तपास सपोनि एस़एस़धस हे करीत आहेत़