मोकिंद खिल्लारे सहा वर्षांसाठी भाजपातून निलंबित
By Admin | Updated: July 8, 2017 00:06 IST2017-07-08T00:00:32+5:302017-07-08T00:06:06+5:30
परभणी : येथील महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मोकिंद बळीराम खिल्लारे यांना शिस्तभंगाच्या कारणावरुन पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले

मोकिंद खिल्लारे सहा वर्षांसाठी भाजपातून निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मोकिंद बळीराम खिल्लारे यांना शिस्तभंगाच्या कारणावरुन पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश पक्षाचे सरचिटणीस आ. सुरजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी काढले आहेत.
परभणी महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवड तसेच स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेच्या वेळी पक्षादेश डावलून पक्ष शिस्तभंग करणे, पक्षाच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेऊन पक्षाची जनमाणसांत प्रतिमा मलीन करणे अशा व इतर पक्षविरोधी कृत्याच्या गंभीर तक्रारी व अहवाल पक्षाकडे प्राप्त झाल्याने भारतीय जनता पार्टीतून मोकिंद खिल्लारे यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.