संशोधक गाईडविना
By Admin | Updated: August 3, 2016 00:17 IST2016-08-03T00:04:11+5:302016-08-03T00:17:10+5:30
औरंगाबाद : पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पीईटी) अर्थात ‘पेट’ परीक्षा जाहीर झाली असून, या परीक्षेच्या माध्यमातून फीच्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा

संशोधक गाईडविना
औरंगाबाद : पीएच. डी. एन्ट्रन्स टेस्ट (पीईटी) अर्थात ‘पेट’ परीक्षा जाहीर झाली असून, या परीक्षेच्या माध्यमातून फीच्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुमारे पन्नास लाख रुपये मिळणार आहेत. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी ‘पेट ३’ दिलेल्या ४४५ विद्यार्थ्यांना अद्यापही गाईड मिळाले नसल्याची परिस्थिती आहे.
विद्यापीठाने सुमारे तीन वर्षांच्या कालावधीनंतर ‘पेट ४’ जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी ‘पेट’ देतात. पीएच. डी. करण्यासाठी पात्र व्हाव्या लागणाऱ्या या परीक्षेनंतर अध्यापन क्षेत्रात संधी मिळते. अनेक विद्यार्थी ‘नेट’, ‘सेट’ आदी परीक्षा पास होत नसल्याने ते पीएच. डी. चा मार्ग स्वीकारतात. त्यामुळे ‘पेट’देणारे हजारो विद्यार्थी असतात. आॅगस्टनंतर होणाऱ्या यंदाच्या परीक्षेसाठी सुमारे दहा हजार विद्यार्थी पेट देतील असा अंदाज आहे. २०१४ मध्ये झालेल्या पेट परीक्षेसाठी सुमारे नऊ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यंदा विद्यापीठाने खुल्या वर्गासाठी सहाशे रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे रुपये फी ठेवली आहे. दहा हजार विद्यार्थी परीक्षेला बसल्यास विद्यापीठाला सुमारे पन्नास लाख रुपये इतकी मोठी रक्कम मिळणार आहे.
पेट ३ दिलेल्या ४४५ विद्यार्थ्यांना अद्यापही गाईड मिळालेले नाहीत, अशी माहिती मिळाली. पेट ३ दिलेल्या दिलेल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांत विद्यापीठ मार्गदर्शक देऊ शकले नाही. त्यामुळे ‘पेट ४ ’ मध्ये उत्तीर्ण झालेल्या किती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळतील याबाबत विद्यार्थी साशंक आहेत. ‘पेट ४’ साठी किमान एक हजार विद्यार्थी प्रविष्ट होतील. त्यातील किमान ५०० ते ५५० विद्यार्थी उत्तीर्ण होतील, असे गृहीत धरले तरी या विद्यार्थ्यांना ‘गाईड’ देणे शक्य दिसत नाही. पेट ३ मधील ४४५ विद्यार्थी व पेट ४ मधील पाचशे विद्यार्थी अशा सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना ‘गाईड’ पुरविण्याची जबाबदारी विद्यापीठावर येऊन ठेपणार आहे.