७ लाख ३० हजार मीटरमध्ये फेरफार
By Admin | Updated: October 27, 2016 00:56 IST2016-10-27T00:43:40+5:302016-10-27T00:56:27+5:30
औरंगाबाद : मराठवाडा प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ११ जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख ३० हजार ५३८ विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याच्या संशयावरून महावितरणने तपासणी मोहीम हाती घेतली आहे

७ लाख ३० हजार मीटरमध्ये फेरफार
औरंगाबाद : मराठवाडा प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या ११ जिल्ह्यांतील सुमारे ७ लाख ३० हजार ५३८ विद्युत मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याच्या संशयावरून महावितरणने तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या सर्व विद्युत मीटरमध्ये दरमहा १ ते ३० युनिटदरम्यान वीज वापरण्याचे प्रमाण रीडिंग घेताना आढळून आले आहे. हे सर्व मीटर बदलणे किंवा ते दुरुस्त करणे यापलीकडे तरी कंपनीकडे दुसरा पर्याय सध्या तरी नाही. त्यामुळे मराठवाडा प्रादेशिक कार्यालयाने या फेरफारीचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील सर्व अभियंत्यांची याप्रकरणी बैठक घेऊन त्यांना मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता तथा प्रभारी संचालक सुरेश गणेशकर यांनी दिली.
या मोहिमेत ५ हजारांपेक्षा जास्त वीज बिल थकित असलेल्या ग्राहकांचे