शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:30 IST

मोबाइल चोरीस गेल्यानंतर भाजीविक्रेता सीमकार्ड बंद करायचा विसरल्याने चोरट्यांनी घेतला गैरफायदा

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल चोरीला गेल्यानंतर सीमकार्ड बंद न करणे भाजीविक्रेत्याला चांगलेच महागात पडले. चोराने त्याच मोबाइलमधील यूपीआय ॲपचे पासवर्ड बदलून २ लाख ३८ हजार रुपये लंपास केले. बुधवारी याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अख्तर वजीर खान (४६, रा. फुलंब्री) हे जाधववाडीत भाजीविक्री करतात. २७ जुलै रोजी पहाटे ५ वाजता ते जाधववाडीत भाजीविक्री करण्यासाठी गेले होते. सकाळी ८:३० ते ९:३० वाजेदरम्यान अज्ञाताने त्यांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी मोबाइल हरवल्याची नोंद केली. ४ ऑगस्ट रोजी दुपारी अख्तर कामानिमित्त बँकेत गेले होते. तेथे मात्र त्यांना खात्यात केवळ ७५ रुपयेच असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांना मोबाइल चोरीला गेल्यानंतर सदर चोराने यूपीआय आरआरएन क्रमांकावरून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ३८ हजार रुपये काढून घेतल्याचे समजले.

सीमकार्ड बंद केले नव्हतेमोबाइल गहाळ झाल्यानंतर अख्तर यांनी सीमकार्ड बंद केले नव्हते. पोलिसांच्या निरीक्षणानुसार त्यांच्या मोबाइलला पासवर्डदेखील नव्हता. परिणामी, चोर सहज यूपीआय ॲपपर्यंत पोहोचू शकला. सीम बंद नसल्याने मोबाइलमध्ये त्याला बँक खाते, आधार कार्डची माहिती सहज उपलब्ध झाली. त्यावरून त्याने त्याच क्रमांकावर ओटीपी मिळवत पासवर्ड बदलला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.

नऊ दिवस पैसे काढत होताचोराने एकाच वेळी पैसे वळते केले नाही. २७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान त्याने ही सर्व रक्कम विविध खात्यांवर वळती केली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी