मोबाईल टॉवरप्रकरणी सुनावणी १६ आॅगस्टला

By Admin | Updated: August 13, 2014 01:42 IST2014-08-13T01:15:36+5:302014-08-13T01:42:06+5:30

औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स अधिकृत की अनधिकृत हे युद्ध अजून शमले नाही. १६ आॅगस्ट रोजी टॉवर्स कंपन्या आणि मनपा यांच्यातील वादाप्रकरणी आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

The mobile tower case hearing on August 16th | मोबाईल टॉवरप्रकरणी सुनावणी १६ आॅगस्टला

मोबाईल टॉवरप्रकरणी सुनावणी १६ आॅगस्टला

औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स अधिकृत की अनधिकृत हे युद्ध अजून शमले नाही. १६ आॅगस्ट रोजी टॉवर्स कंपन्या आणि मनपा यांच्यातील वादाप्रकरणी आयुक्तांच्या दालनात सुनावणी होणार आहे.
शहरात १२ ते १३ मोबाईल कंपन्यांचे ३८२ टॉवर्स आहेत. यातील ४७ टॉवर्स अधिकृत असल्याचा दावा करसंकलक अधिकारी शिवाजी झनझन यांनी केला.
३३२ टॉवर्स अनधिकृत आहेत. मागील महिन्यांत मोबाईल कंपन्यांकडून करवसुलीसाठी मोहीम राबविली.
कंपन्यांकडे ९ कोटी ५८ लाख २७ हजार रुपयांचा कर थकीत होता. त्यातून ४ कोटी ४५ लाख ६१ हजार ६६ रुपयांचा कर पालिकेला मिळाला. ५ कोटी १२ लाख ६५ हजार रुपयांचा कर मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे थकीत आहे. जीटीएल कंपनीचे ९ मोबाईल टॉवर्स सील केलेले आहेत. त्यांच्याकडे १८ लाख रुपयांचा कर थकलेला आहे, असे झनझन यांनी सांगितले.

Web Title: The mobile tower case hearing on August 16th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.