मोबाईल चोरास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:23+5:302021-07-07T04:06:23+5:30
------------------------------------------------- शस्त्र साठा प्रकरणात एकाला पोलीस कोठडी औरंगाबाद : गरम पाणी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ तलवारींसह ...

मोबाईल चोरास पोलीस कोठडी
-------------------------------------------------
शस्त्र साठा प्रकरणात एकाला पोलीस कोठडी
औरंगाबाद : गरम पाणी परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ तलवारींसह एक गुप्ती व कुकरी असा सुमारे ६ हजार ५०० रुपयांचा शस्त्र साठा जप्त केला. या गुन्ह्यात शेख इर्शाद ऊर्फ ईशू शेख सईद याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी पी. आर. शिंदे यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील मनीषा गंडले यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-------------------------------------------------
बनावट स्पेअरपार्ट विकणाऱ्या दोन दुकानदारांना पोलिस कोठडी
औरंगाबाद : नामांकित कंपनीच्या कारचे बनावट स्पेअरपार्ट विक्री करणारे गुरमिसिंग कर्नलसिंग बिंद्रा आणि सेवा अमित प्रेमचंद जैन या दोन दुकानदारांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृंगारे-तांबडे यांनी दिले. सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-----------------------------------------------------------------
तलवार जप्त; चौघांना पोलिस कोठडी
औरंगाबाद : गुगलवरून कुरिअरने तलवार मागविल्याच्या गुन्ह्यात राशेद सालमीन दीप, शेख आरबाज शेख शेरू, मोहम्मद फरदीन मोईन बागवान आणि फैजान हारुण कुरेशी या चौघांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी मंगळवारी दिले. सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
-----------------------------------------------------------------
लाचेच्या गुन्ह्यात लिपिकाला पोलिस कोठडी
औरंगाबाद : आदिवासी वसाहतीसाठी मंजूर असलेल्या मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा उर्वरित ३ लाखांचा धनादेश देण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ लिपिक शैलेंद्र कृष्णराव भोपे याला ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष सत्र न्यायाधीश टी.जी. मिटकरी यांनी मंगळवारी दिले. सहायक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी सरकारतर्फे काम पाहिले.
---------------------------------------------------------------