मोबाईलची चोरी सीसीटीव्हीत कैद

By Admin | Updated: December 24, 2016 21:31 IST2016-12-24T21:31:04+5:302016-12-24T21:31:50+5:30

लातूर : औसा रोडवरील एका मोबाईलच्या दुकानात ग्राहकाच्या खिशातून मोबाईल चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याची घटना घडली़

Mobile Theft: CCTV Captured | मोबाईलची चोरी सीसीटीव्हीत कैद

मोबाईलची चोरी सीसीटीव्हीत कैद

लातूर : औसा रोडवरील एका मोबाईलच्या दुकानात ग्राहकाच्या खिशातून मोबाईल चोरी करणारा चोर सीसीटीव्हीत कैद झाल्याची घटना घडली़ मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला असला तरी सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे़
लातूर शहरातील औसा रोडवरील नंदी स्टॉप येथे नंदी मोबाईल नावाने दुकान आहे़ या दुकानात मोबाईल विक्रीसह रिचार्जचीही सुविधा आहे़ सायंकाळच्या सुमारास ग्राहक योगिराज माने हे रिचार्जसाठी काऊंटरवर उभे होते़ सोबतच्या मित्रासोबत गप्पा गोष्टी सुरू असताना बाजूस थांबलेल्या एका चोरट्याने अलगदपणे त्यांच्या वरच्या खिशातील मोबाईल काढला़ लागलीच तो तेथून पसारही झाला़ तत्काळ दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले़ यात एका चोरट्याने योगिराज माने यांच्या बाजूस थांबून अलगदपणे मोबाईल पळविल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे़ सीसीटीव्हीचे सर्व फुटेज दुकान मालकाने माने यांना देऊन पोलिसात तक्रार देण्यासाठीही सहकार्य केले़ याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत नोंद आहे़

Web Title: Mobile Theft: CCTV Captured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.