एसटीचे ‘मोबाईल रिजर्वेशन अ‍ॅप’!

By Admin | Updated: July 25, 2016 00:12 IST2016-07-25T00:12:51+5:302016-07-25T00:12:51+5:30

जालना : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवाशांना घरबसल्या सुविधा सुविधांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने ‘मोबाईल रिजर्वेशन अ‍ॅप’ सुरू केले आहे.

Mobile Reservation App of ST! | एसटीचे ‘मोबाईल रिजर्वेशन अ‍ॅप’!

एसटीचे ‘मोबाईल रिजर्वेशन अ‍ॅप’!

येवदा पोलिसांची कारवाई : वडनेरगंगाई येथील घटना
दर्यापूर : गोवंश हत्या करून मांस विक्री करणाऱ्यास येवदा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही घटना रविवारी पाहटे ४.३० वाजता कसाईपुरा येथे घडली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
अन्सार अहमद अब्दूल सत्तार (३५), शे अफजल इब्राहीम (३०), शे हबीब शे मजीद ६५ असे सर्व रा. वडनेरगंगई, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात गोवंशाची हत्या करून अवैधरीत्या मांस विक्री करण्यात येत होते. या ठिकाणी बैलाची अमानुष कत्तल झाल्याची महिती येवदा पोलिसांना मिळताच ठाणेदार नरेश पिंपळकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. हे मांस तपासण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी दयाराम धोटे यांना पाचारण करुन पंचनामा करण्यात आला आहे. गोवंशचे हाडे व मास गावाच्या बाहेर जमीनीत गाळण्यात आले आहे.
आरोपी विरुध्द कलम ५( क ) व प्राणी संरक्षण कायदा प्रतिबंध कलम ११(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येवद्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर करीत आहे. घटनास्थळी गावकऱ्यांची गर्दी झाली होती. या परिसरात गोवंश हत्या रोखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Mobile Reservation App of ST!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.