भरधाव कार घुसली मोबाईल शॉपीत
By Admin | Updated: February 26, 2017 00:54 IST2017-02-26T00:52:54+5:302017-02-26T00:54:44+5:30
ंअंबाजोगाई : येथील आंबेडकर चौकातील सोपानकाका मोबाईल शॉपीममध्ये नवी कोरी कार शनिवारी सकाळी घुसली

भरधाव कार घुसली मोबाईल शॉपीत
ंअंबाजोगाई : येथील आंबेडकर चौकातील सोपानकाका मोबाईल शॉपीममध्ये नवी कोरी कार शनिवारी सकाळी घुसली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सुमित सुधाकर गोरे (रा. आंबेडकर चौक) हा दंत महाविद्यालयात शिक्षण घेतो. नवी कार चालविताना ब्रेक ऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने ती थेट शॉपीत घुसली. एका वृद्धेने आपल्या नातवाला बाजूला सारल्याने अपघात टळला. कारने तीन दुचाकींनाही उडविले. शॉपी व दुचाकींचे नुकसान झाले. उशिरापर्यंत शहर ठाण्यात नोंद नव्हती. (वार्ताहर)