मनसेचा हिंगोलीत मोर्चा

By Admin | Updated: August 20, 2014 00:24 IST2014-08-20T00:15:26+5:302014-08-20T00:24:32+5:30

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

MNS's Hingoli Front | मनसेचा हिंगोलीत मोर्चा

मनसेचा हिंगोलीत मोर्चा

हिंगोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीसह उपाययोजनांची अंमलबजावणी करा आदी मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. उगवलेले पीक मागच्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्याने पिवळे पडत आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. या परिस्थितीत दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकरी तीस हजारांची मदत द्यावी, दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करून त्यावर त्वरित अंमलबजावणी करावी , गुरांसाठी चारा छावण्या, डेपो उघडावेत, शेतमजुरांना रोहयोची कामे उपलब्ध करून द्यावीत, टंचाईग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांचे कर्ज, वीजबिल पूर्ण माफ करावे आदी मागण्याही करण्यात आल्या. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, संदेश देशमुख, ओम कोटकर, जांबुवंत पाटील, विनोद बांगर, कय्युमखॉं पठाण, आनंद सारडा, कल्याण देशमुख, संतोष बांगर, विशाल गोटरे, राजू नागरे, विकास शिंदे, रवी पाटील, शिवाजी सांगळे, रामदास जिनेवाड, कडूजी जाधव, प्रमोद पोहकर, बद्री कोटकर, प्रकाश पाटील, देवीदास कुंदर्गे, संतोष खंदारे, गजानन भालेराव, प्रवीण टाले, राजेश बांगर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: MNS's Hingoli Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.