शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचं हिंदुत्व बोगस अन् कुणाचं खरं हे महाराष्ट्राला माहीत आहे- नितिन सरदेसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 12:15 IST

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी निशाणा साधाल आहे.

औरंगाबाद- मनसे आणि भाजपचं  हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या. याबरोबरच भाजपवर तुटून पडा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्य बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. 

बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेचं काय सुरु होतं? असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले. याबरोबरच भाजपवर तुटुन पडा, त्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर द्या, भाजप आणि मनसे यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे जनतेला दाखवा, आपली कामं लोकापर्यंत पोहोचवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी निशाणा साधाल आहे. महाराष्ट्राच्या जनतेला कुणाचं हिंदुत्व बोगस आणि खरं आहे हे माहीत असून हिंदुत्वाचा वसा घेतलेले लोक कसे वागतायत हे महाराष्ट्राला माहीत आहे, असं नितीन सरदेसाईंनी म्हटलं. तसेच औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र आता तो नाहीय, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्याचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच पुढील आठवड्यात  उद्धव ठाकरे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. त्यानंतर लगेच आठवड्याभरातच पुणे आणि औरंगाबाद या दोन सभा जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे १ मे  रोजी औरंगाबादमध्ये  ज्या मैदानात सभा घेणार आहेत. त्याच मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNitin Sardesaiनितीन सरदेसाईMNSमनसेShiv Senaशिवसेना